शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

उल्हासनगरात शैक्षणिक साहित्य घोटाळा

By admin | Updated: August 18, 2015 23:12 IST

महापालिकेने ७ हजार विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या शैक्षणिक साहित्य खरेदीत लाखोंचा भ्रष्टाचार झाला असून दप्तर, पाण्याची बाटली, जेवणाचा डबा आणि वह्या हा

उल्हासनगर : महापालिकेने ७ हजार विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या शैक्षणिक साहित्य खरेदीत लाखोंचा भ्रष्टाचार झाला असून दप्तर, पाण्याची बाटली, जेवणाचा डबा आणि वह्या हा साहित्य संच १९५० रूपयाला दाखविण्यात आला आहे. बाजारात या साहित्यसंचाची किंमत ५०० रुपयांपेक्षा जास्त नसल्याची टीका होत असून शैक्षणिक साहित्याची चौकशी करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. एकाच वेळी ७ हजार मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केल्याचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी सांगितले. दोन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप झाले असून यावेळी शाळा परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले. विद्यार्थ्यांसह शाळेतील शिक्षकही आठवड्यातून दोन दिवस गणवेशात दिसणार असून त्यांना चिक्कीच्या लेखा-जोख्याची जबाबदारी देण्यात आली आहे. उल्हासनगर महापालिका शिक्षण मंडळाच्या २८ शाळांतील ७ हजार विद्यार्थी दोन महिने शैक्षणिक साहित्यापासून वंचित होते. पालिका आयुक्त मनोहर हिरे, उपायुक्त जमीर लेंगरकर यांच्या प्रयत्नातून दोन महिने उशिराने का होईना शैक्षणिक साहित्याचे वाटप झाले आहे. गेल्या वर्षी तर दिवाळीनंतर शैक्षणिक साहित्याचे वाटप झाल्याने सर्व स्तरातून टीका झाली होती. मुलांची शाळेतील १०० टक्के उपस्थिती हेच उद्दिष्ट असून शिक्षकही आठवड्यातून दोन दिवस शालेय गणवेशात दिसणार आहे. शिक्षकांना पांढरा शर्ट आणि काळी पँट तर शिक्षिकांना गुलावी रंगाचा पंजाबी ड्रेस देणार असल्याचेही लेंगरेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)