शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षणही ‘कुपोषित’

By admin | Updated: July 23, 2015 04:09 IST

आदिवासी विद्यार्थ्यांना शहरी भागातील आश्रमशाळा तसेच निवासी शासकीय वसतिगृहांत राहून चांगले शिक्षण घेता यावे व त्यांना

शौकत शेख, डहाणूआदिवासी विद्यार्थ्यांना शहरी भागातील आश्रमशाळा तसेच निवासी शासकीय वसतिगृहांत राहून चांगले शिक्षण घेता यावे व त्यांना दर्जेदार सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी शासनाने नवीन इमारती बांधकामासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर केला. परंतु, शासनाच्या उदात्त हेतूला मूठमाती देण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच आदिवासी विकास प्रशासनाकडून होत आहे. या दुर्लक्षित कारभारामुळे डहाणू, तलासरी, पालघर, वसई या भागांतील आश्रमशाळा तसेच निवासी वसतिगृहांची विदारक परिस्थिती आहे. येथे गेल्या पाच वर्षांपासून नवीन इमारतीचे बांधकाम रखडल्याने येथील हजारो आदिवासी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.विशेष म्हणजे पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, पालघर तसेच वसई भागातील शासकीय आश्रमशाळा, तसेच अनुदानित, विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांतून दरवर्षी हजारो विद्यार्थी उत्तीर्ण होत असत. पुढील शिक्षणासाठी ते वरील तालुक्यांतील आश्रमशाळा तसेच निवासी वसतिगृहात अर्जही करीत असत. परंतु, वर्षानुवर्षांपासून बहुसंख्य भाड्याच्या इमारतीत असलेल्या आश्रमशाळा तसेच वसतिगृहांची मर्यादित संख्या व क्षमता वाढत नसल्याने हजारो आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते.डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या बहुसंख्य आश्रमशाळा तसेच निवासी वसतिगृहे गेल्या अनेक वर्षांपासून भाड्याच्या इमारतीत असल्याने त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. शासनाने आश्रमशाळा तसेच शासकीय वसतिगृहांची इमारत आदिवासी विकास विभागाच्या मालकीची व्हावी म्हणून पाच वर्षांपूर्वी १४ आश्रमशाळांच्या इमारती बांधकामासाठी ४४ कोटी रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खात्यात वर्ग केला आहे. परंतु, चार तालुक्यांत केवळ आठ आश्रमशाळांच्या इमारतीचे बांधकाम सुरू झाले आहे. तर २२ आश्रमशाळांच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी १५ लाख जमा केले आहेत. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे गेल्या तीन-चार वर्षांत एकही आश्रमशाळेची इमारत तयार झालेली नाही. परिणामी, आश्रमशाळा तसेच निवासी वसतिगृह चालत असलेल्या भाड्याच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गळक्या, पडक्या खोल्यांमध्ये रहावे लागते.