शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

मिरचीचे अर्थकारण बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 23:04 IST

हवामानातील बदलासह प्रतिकिलोच्या दरात होणाऱ्या घसरणीमुळे मिरची उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे. या पिकाकरीता गुंतवणूक केलेले पैसेही भरून निघत नसल्याने शेतकरी हवालिदल बनला आहे.

अनिरु द्ध पाटील बोर्डी : हवामानातील बदलासह प्रतिकिलोच्या दरात होणाऱ्या घसरणीमुळे मिरची उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे. या पिकाकरीता गुंतवणूक केलेले पैसेही भरून निघत नसल्याने शेतकरी हवालिदल बनला आहे.मागील चार-पाच वर्षांपूर्वी मिरचीला चांगला दर मिळाला होता. तथापि डहाणू आणि तलासरी तालुक्यात या पिकाच्या लागवड क्षेत्रात कमालीची वाढ झाली. मात्र या हंगामात डिसेंबर महिन्यात ओखी वादळाने पाऊस आणि हवामानात बदल झाला. जमिनीतील ओलावा आणि त्यानंतर दोन-तीन महिने थंडी असल्याने बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला. राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या गारांसह पाऊस पडला. त्या वेळीही बदललेल्या हवामानाचा फटका बसून पिकावर दुष्परिणाम झाला. आगामी काळात चांगला दर मिळेल या आशेने शेतकºयांनी पैसा खर्च करून कीटकनाशक फवारणी केली. मात्र दीड मिहन्यापूर्वी फक्त तीन-चार दिवसच प्रति किलो ५० रूपयांचा दर मिळाला. त्यानंतर या हंगामात मिरचीने भाव खाल्लाच नसल्याची व्यथा शेतकºयांनी मांडली. शिवाय लागवड केलेल्या काही जातीचे बियाणे निकृष्ट दर्जाचे आणि भेसळयुक्त निघाल्याने या रोपांची अपेक्षित वाढ झालीच नाही. त्यामुळे वैतागलेल्या बळीराजाने ऐन उत्पादनाच्या काळात पिकांना पाणी देण्याचे सोडून देत, काळजावर नांगर फिरवला. ज्या जाती तगधरून राहिल्या त्यांना मिळणारा भाव खूपच कमी असून त्याच्या तोडणी करीता लागणारे मजुरीचे पैसेही भरून निघणे मुश्किल झाले आहे. शिवाय उन्हाच्या तडाख्याने रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून फलगळतीसह त्याचा आकार व रंग यावर परिणाम दिसून येत आहे. ही सबब पुढे करून व्यापारी चांगला दर द्यायला तयार नाही. दरम्यान या पिकाकरीता गुंतवलेला पैसाही वसूल झालेला नसून मिरची उत्पादक आर्थिक संकटाचा सामना करीत आहे.