शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी भातशेती पिके धोक्यात

By admin | Updated: February 15, 2017 23:26 IST

सूर्या कालव्याची वेळोवेळी साफ सफाई केली नसल्याने मोठया प्रमाणात गाळ,गोटे, झुडपे व गवत वाढल्याने शेतीला अपुरा पाणीपुरवठा होतो

कासा : सूर्या कालव्याची वेळोवेळी साफ सफाई केली नसल्याने मोठया प्रमाणात गाळ,गोटे, झुडपे व गवत वाढल्याने शेतीला अपुरा पाणीपुरवठा होतो आहे. त्यामुळे संपूर्ण कालवाच गाळात रूतला अशी स्थिती असून उन्हाळी पिके धोक्यात सापडली आहेत. या कालव्यातून डहाणू, पालघर तालुक्यातील शेकडो गावांना उन्हाळी शेतीला पाणीपुरवठा के ला जातो. याच पाण्यावर शेतकरी उन्हाळयात प्रामुख्याने भातशेती करतात. तसेच भुईमूग व भाजीपाल्याची लागवड करतात. मात्र, गेल्या पाच वर्षापासून या कालव्यांची पूर्णपणे साफसफाई केली गेलेली नाही. तसेच, गाळही काढला गेलेला नाही. त्यामुळे मुख्य कालव्याबरोबरच लघु कालवेही गाळाने भरले आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे. तसेच मुख्यकालव्यांतून लघूकालव्यांना पाणी सोडणारे गेट ही गाळाने भरल्याने पाणी बंद झाले आहे. तर काही ठिकाणी गेट तुटल्याने पाणी वाया जाते. यामुळे शेवटच्या गावातील शेतांना अपुरा पाणीपुरवठा होतो. पेठ येथे वेळेवर पाणीपुरवठा न झाल्याने शेतकऱ्यांच्या भातरोपण्या आठवडाभर रखडल्या आहेत. अपुऱ्या पाणीपुरवठयामुळे शेतकरी रोपणीच्या वेळेस कालव्यांना मध्येच बांध टाकत असल्याने पुढील गावांना पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे भातशेतीवर मोठा परिणाम होत आहे. (प्रतिनिधी)