शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

यंदाच्या दिवाळीवर दुष्काळाचे सावट

By admin | Updated: October 31, 2015 22:30 IST

गणेशोत्सव व नवरात्र सण नुकतेच पार पडले. आता प्रतिक्षा आहे दिपावलीची. या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दिपावली येत असून शहरी व ग्रामीण भागात दिवाळीची आतापासूनच धामधुम

- दिपक मोहिते,  वसईगणेशोत्सव व नवरात्र सण नुकतेच पार पडले. आता प्रतिक्षा आहे दिपावलीची. या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दिपावली येत असून शहरी व ग्रामीण भागात दिवाळीची आतापासूनच धामधुम सुरू झाली आहे. परंतु यंदा दिपावलीवरही मंदीचे सावट आहे. तर ग्रामीण भागामध्ये पाऊस कमी झाल्यामुळे भातपीकाचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे बळीराजामध्येही फारसा उत्साह नाही. गेला महिनाभर या उपप्रदेशातील वातावरण सतत बदलत असल्यामुळे बागायती क्षेत्रावरही चांगलाच परिणाम जाणवत आहे. ढगाळ वातावरणामुळे कृषी क्षेत्रावर विपरीत परिणाम होईल अशी भीती ग्रामीण भागात व्यक्त होत आहे.वसई विरार उपप्रदेशाच्या ग्रामीण भागात यंदा दसरा, नवरात्री साजरा करण्यासंदर्भात उत्साह नव्हता. पावसाचे प्रमाण अत्यंत कमी, त्याचा शेतीवर परिणाम व निसर्गाच्या लहरीपणामुळे भातशेतीचे प्रमाण कमी होत गेले. पूर्वी वसईचा तांदुळ सर्वदूर विक्रीसाठी जात असे परंतु आता वर्षभर पुरेल इतकाच भात बळीराजाच्या हाती लागतो. शहरी भागामध्ये महागाईने उच्चांक गाठल्यामुळे सण साजरे कसे करायचे असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर उभा ठाकला आहे. कांदे व तुरडाळीने नागरीकांना अक्षरश: रडवले आहे. ऐन दिपावलीच्या तोंडावर तुरडाळ व मुगाच्या डाळीने भाववाढीचा उच्चांक नोंदला आहे. कांदे आजही ५० ते ६० रू. किलो दराने विकले जातात तर यंदाच्या दिपावलीमध्ये मुगाच्या डाळीच्या चकल्या पहावयास मिळणार नाहीत अशी शक्यता आहे. गेल्या काही महिन्यापासून वसई विरार उपप्रदेशातील हवामानात प्रचंड फरक पडला असू त्याचा परिणाम कृषीक्षेत्रावर जाणवू लागला आहे. येथील ऋतुचक्र वारंवार का बदलले जाते याचा शोध घेण्याची गरज आहे.यंदा निसर्गाची साथ बळीराजाला न मिळाल्यामुळे पुढील वर्षी ग्रामीण भागातील अनेक शेतकरी भात लागवडीऐवजी अन्य पीके घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. एकेकाळी पारंपारीक पद्धतीने आपले सण साजरा करणारा आदिवासी समाजही निसर्गाच्या लहरीपणामुळे उदास आहे. केवळ शेठजींच्या वाडीवर रोजगार मिळवून आदिवासी भूमीपुत्र आपले सण कसेबसे साजरे करीत आहेत.