शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाचे बंधारे करोडो खर्चूनही कोरडेच

By admin | Updated: March 20, 2017 01:53 IST

भीषण पाणी टंचाईत होरपळणाऱ्या महाराष्ट्राला दिलासा देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी राबविलेली महत्वकांक्षी

रवींद्र साळवे / मोखाडाभीषण पाणी टंचाईत होरपळणाऱ्या महाराष्ट्राला दिलासा देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी राबविलेली महत्वकांक्षी जलयुक्त शिवार योजना मोखाडा कृषी विभागाने बासनात गुंडाळली आहे.सन २०१६-१६ च्या दरम्यान मोखाडा कृषी विभागाने पोशेरा, खोच, उधळे, जोगलवाडी, किनिस्ते, कारेगाव, ब्राह्मणगाव, आसे, दांडवळ, धामणी, सूर्यमाळ, डोल्हारा अशा १४ गावांमध्ये जलयुक्त शिवारच्या अंतर्गत ५ कोटी खर्च करून बांधलेले बंधारे निकृष्ट बांधकामामुळे कोरडे ठाक पडले आहेत. त्यात थेंबभरही पाणी साठत नाही. जोगलवाडी मोहिते कॉलेज जवळ कृषी विभागाने सन २०१५-१६ मध्ये १४ लाख रु पये खर्चून २८ मीटर लांबीचा सिमेंट बंधारा बांधला. परंतु निकृष्ट बांधकामामुळे त्यात आज एक थेंबही पाणी नाही. हे काम सुरु असतांना अनेक तक्रारी ग्रामस्थांनी केल्या होत्या तेव्हा हे काम थांबवले जाईल असे तालुका कृषी अधिकारी बी बी वाणी यांनी सांगितले होते परंतु याकडे त्यांनी हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले आणि पहिल्याच पावसात या बंधाऱ्याला गळती लागली या निकृष्ट बंधाऱ्याचे वृत्तही लोकमतने प्रसिद्ध केले होते. यानंतर कृषिविभागाच्या अधिकाऱ्यांनी थातूरमातूर चौकशी करण्यात समाधान मानले. त्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यांसह ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. इतर बंधाऱ्यांची अवस्था काही वेगळी नाही यामुळे बंधाऱ्यांवर झालेला करोडोचा खर्च अधिकाऱ्यांनीच ठेकेदारांच्या घशात घातला का? असा संतप्त सवाल विचारला जात आहेपावसाचे पाणी शिवारात अडवून भूजल पातळी वाढवणे, शेतीसाठी पाण्याची सोय व्हावी, गुराढोरांना प्यायला पाणी मिळावे, विकेंद्रित पाणी साठा निर्माण व्हावा असे उद्देश बाळगून जलयुक्त शिवार योजने अंतर्गत सिमेंट बंधारे, मातीबंधारे, बंधाऱ्यांचे खोलीकरण अस्तित्वात असलेल्या परंतु निकामी झालेले बंधारे दुरूस्त करणे अशी विविध कामे केली गेली. यामध्ये प्रामुख्याने सिमेंट बंधाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. परंतु कृषी विभागाच्या आशीर्वादामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात बोगस कामे झाली. त्यामुळे जलयुक्त शिवार योजना बासनात गुंडाळल्याचे चित्र निर्माण झाले. हे बंधारे कोरडे ठाक पडल्याने बोगस कामे करणाऱ्या ठेकेदारांसह अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.