शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

धामणशेतवासीयांच्या घशाला कोरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 02:46 IST

धामनशेत ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या पाटील पाडा, ठाकूरवाडी, धामनशेत या गावपाड्यांना भीषण पाणीटंचाईचे चटके लागत असताना टँकरची मागणी करून ही अजून पर्यत टँकरने पाणी पुरवठा केला गेलेला नाही

रविंद्र साळवे  मोखाडा : धामनशेत ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या पाटील पाडा, ठाकूरवाडी, धामनशेत या गावपाड्यांना भीषण पाणीटंचाईचे चटके लागत असताना टँकरची मागणी करून ही अजून पर्यत टँकरने पाणी पुरवठा केला गेलेला नाही यामुळे घोटभर पाण्यासाठी येथील आदिवासी बांधव वणवण भटकंती करावी लागत आहे.येथील गावपाड्यांची लोकसंख्या १६०० च्या आसपास आहे. गेल्या काही दिवसापासून येथील विहिरींनी तळ गाठल्याने माती मिश्रीत गढूळ पाणी प्यावे लागत आसल्याने धामनशेतकर वाशीयांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.येथील मुख्य व्यवसाय हा शेती व निगडीत उद्योग असल्याने हा महिना शेतीची मशागत व राबणीचा असल्याने एकीकडे पाणीबाणी तर दुसरीकडे शेती अशी शेतकºयांची द्विधा मनस्थीती झाली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी नायब तहसीलदार पी. जी. कोरडे यांच्याशी संपर्क साधला असता धामणशेत येथील प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हास्तरावर पाठवला असून मंजुरी मिळताच टँकर सुरू केले जाईल अशी माहिती त्यांनी लोकमतला दिली. दरम्यान, मंजुरीच्या लालफितीचा फटका जनता सोसत आहे हेच खरे!तालुक्यात पाणी टंचाईने अतिशय उग्र रूप धारण केले आहे. जसा जसा सूर्याचा पारा वाढत आहे, तस तशी पाणी टंचाई असलेल्या गावांमध्ये भर पडत आहे. तालुक्यातील टंचाईच्या गावपाड्यांची संख्या ६० वर पोहचली असून १९ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. यामधील धामणशेत येथील प्रस्ताव पडून आहे जिल्हास्तरावर मंजूरीसाठी पाठवला असल्याचे नायब तहसीलदारांनी सांगितले असले तरी गेल्या ४ ते ५ दिवस सलग सुट्या आल्याने आणखी कीती दिवस टँकरची प्रतिक्षा पहावी लागणार असा प्रश्न जनता विचारत आहे. टंचाईग्रस्त गावपाड्यात त्वरित टँकर द्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा यासाठी टँकर अधिग्रहण करण्याचे अधिकार तहसीदारांना दिले जातात परंतु या नियमाची अंमलबजावणी होताना दिसत नाही.