शहरं
Join us  
Trending Stories
1
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
2
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
3
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
4
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
5
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
6
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
7
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
8
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
9
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
10
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
11
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
12
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
13
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
15
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
16
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
17
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
18
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
19
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
20
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार

डॉक्टरांची दांडी, नर्सचा उपचारास नकार

By admin | Updated: February 15, 2017 04:28 IST

दांडी येथील निहार बोरसे ह्या सहा वर्षीय बालकाला विषारी सर्पाने दंश केल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले असता डॉक्टर गैरहजर होते.

हितेन नाईक / पालघरदांडी येथील निहार बोरसे ह्या सहा वर्षीय बालकाला विषारी सर्पाने दंश केल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले असता डॉक्टर गैरहजर होते. परिचारीकेने प्राथमिक उपचार करण्यासही नकार दिल्याने असल्याने पालकांनी त्याला तत्काळ तारापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेल्याने त्याचे प्राण वाचले. वादग्रस्त बाबी साठी दांडी प्राथमिक आरोग्य केंद्र ओळखले जात असून अनुपिस्थत डॉक्टरांवर जिल्हा आरोग्य अधिकारी काय कारवाई करतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.निहार हा संध्याकाळी खेळत असताना घराच्या पायरीवर त्याला एका सर्पाने चावा घेतला. त्याने आपल्या वडिलांना ही बाब सांगितल्या नंतर तात्काळ त्याला दांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. त्यावेळी आरोग्य केंद्राचे दार बंद होते. दरवाजा ठोठावला असता एका महिला कर्मचाऱ्याने बाहेर येत दोन्ही डॉक्टर नसल्याचे सांगितले. उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्या मुलाच्या पायाला रूमाल बांधून प्राथमिक उपचार केले व डॉक्टर नसल्याने मी औषधोपचार करू शकत नाही. त्याला इतरत्र उपचारासाठी न्या, असा सल्ला दिला. त्यामुळे घाबरलेल्या आईवडिलांनी त्याला लांबच्या तारापूर आरोग्य केंद्रात नेले तेंव्हा त्याच्यावर उपचार झाले.जिल्हा परिषद दांडी गटातून तुळदीस तामोरे तर पंचायत समिती गणातून मोरे हे सेनेचे दोन उमेदवार मतदारांनी मोठ्या आशेने निवडून दिले आहेत. सेनेतून बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढविताना मतदारांनी त्यांना मोठ्या अपेक्षेने निवडून दिले. मात्र त्याच्याच गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. शिरीष ठाकरे, डॉ. मोनाली स्वामी हे नियुक्त असतांना उच्छेली-दांडी येथील रूग्णांना तारापूर आरोग्य केंद्रात उपचारासाठी जावे लागत आहे. त्यामुळे अतिरिक्त रुग्णांचा बोजा तारापूर केंद्रावर पडल्याने डॉक्टर उपचारास नकार देतात. मुळात दांडी येथील आरोग्य केंद्रात नेहमीच डॉक्टर अनुपस्थित असल्याच्या तक्रारी असून काही वादग्रस्त घटनाही या केंद्रात होत असल्याच्या तक्रारी जिल्हा अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या आहेत. दोन्ही डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी आहे.