शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

गुन्हा नोंदवण्यासाठी आदेशाची वाट बघू नका -हायकोर्ट

By admin | Updated: April 30, 2015 02:02 IST

माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांविरोधातील चौकशीत काही तथ्य आढळल्यास गुन्हा नोंदवण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाची वाट बघू नका,

मुंबई : माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांविरोधातील चौकशीत काही तथ्य आढळल्यास गुन्हा नोंदवण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाची वाट बघू नका, अशा सूचना बुधवारी उच्च न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) व सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) केल्या. त्यामुळे भुजबळ कुटुंबीयांच्या अडचणी वाढल्या आहेत. दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात छगन भुजबळ यांनी घोटाळा केला असून याची चौकशी करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका आम आदमी पार्टीने दाखल केली आहे. याची दखल घेत न्यायालयाने याच्या चौकशीसाठी एसीबी व ईडीचे संयुक्त पथक स्थापन केले. त्यानुसार एसीबीने याची चौकशी सुरू केली व चौकशीचा दुसरा अंतरिम अहवाल मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांच्या खंडपीठासमोर बुधवारी सादर केला.तो अहवाल बघितल्यानंतर न्यायालयाने दोन्ही तपास यंत्रणांना वरील निर्देश दिले. या अहवालानुसार बँक खात्यातून पैशाची देवाणघेवाण झाल्याचे स्पष्ट होत आहे. तेव्हा यापुढे आता एसीबी आता काय करणार, असा सवालही न्यायालयाने केला.त्यावर ही चौकशी संपवण्यासाठी अजून महिन्याचा कालावधी लागेल. अपूरे पुरावे असल्याने आरोपी सुटले, अशी परिस्थिती भविष्यात उद्भवायला नको म्हणून याची सखोल चौकशी केली जाणार आहे, असे एसीबीचे वकील आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयात स्पष्ट केले. च्या प्रकरणात मनी लाँडरिंगचाही आरोप आहे. त्यामुळे एसीबीची चौकशी पूर्ण झाल्यावरच आम्ही तपास सुरू करणार आहोत, असे ईडीने न्यायालयाला सांगितले. त्यावर या दोन्ही तपास यंत्रणांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवून याची चौकशी करावी व त्यात काही तथ्य आढळल्यास गुन्हा नोंदवण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाची वाट बघू नये, असे खंडपीठाने स्पष्ट केले. यावरील पुढील सुनावणी १६ जूनला होणार आहे.