शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.चा महिलाभिमुख अर्थसंकल्प

By admin | Updated: March 25, 2017 01:08 IST

पालघर जिल्हा परिषदेचा १४ लाख ५२५ रुपये शिल्लकीचा अर्थसंकल्पास शुक्रवारी जिल्हापरिषदेने मान्यता दिली.

हितेन नाईक / पालघरपालघर जिल्हा परिषदेचा १४ लाख ५२५ रुपये शिल्लकीचा अर्थसंकल्पास शुक्रवारी जिल्हापरिषदेने मान्यता दिली. माहिलाभिमुख आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी भक्कम तरतूद असणारा एक आगळावेगळा असा हा वर्ष २०१६-१७ चा व २०१७-१८ चा सुधारित अर्थसंकल्प जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा अर्थ समितीचे सभापती सचिन पाटील ह्यांनी सादर केला.उपाध्यक्ष सचिन पाटील ह्यांनी सभे पुढे अर्थसंकल्प सादर केल्यानंतर गटनेते निलेश गंधे ह्यांनी महिलांच्या विकासाकडे लक्षकेंद्रित करणारा ह्या अर्थसंकल्पाचे स्वागत केले. कुष्ठरोग निर्मूलन, अमृत आहार, सामुदायिक विवाह, जिप शाळांच्या वीज बिलांसाठी तरतूद व नर्सरी शाळात इंग्रजी माध्यमाची केलेली तरतूद आदींचा उल्लेख करीत गंधे ह्यांनी ठाणे जिल्हापरिषदेच्या तुलनेने हा अर्थसंकल्प लहान जरी असला तरी सर्व समावेशक व तळागाळापर्यंत पोचण्याचा प्रयत्न ह्यातून झाल्याचे दिसत असल्याचे सांगितले. वाडा येथील जिप शाळेमध्ये झालेल्या अपघातात तन्वी धानवा ह्या विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता. तिच्या नावाने एखादी योजना सुरु करावी ही मागणी ह्या अर्थसंकल्पात प्रतिबिंबित झाली नसल्याबद्दल तसेच सदस्यांसाठी प्रशिक्षण दौऱ्या बाबत तरतूद नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र हा माहिलाभिमुख अर्थसंकल्प असल्याचे सांगितले जात असले तरी काहीतरी नाविन्यपूर्ण असेल अशी आशा फोल ठरल्याचे जिप सदस्य काशीनाथ चौधरी ह्यांनी सांगितले. महिलांना वाहन चालक प्रशिक्षण आणि टंकलेखन, संगणक प्रशिक्षण, घरघंटी पुरविणे आदिपर्यंत मर्यादित न राहता स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले असते तर ते अधिक समयोचित ठरले असते असे ते म्हणाले. सध्या शासन डिजिटल भारता भोवती फिरत असून गुणवत्ते कडे मात्र लक्ष पुरविले जात नसल्याची टीकाही त्यांनी ह्यावेळी केली.