शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

वसईच्या तहसिलदारांविरोधात असंतोष

By admin | Updated: February 15, 2017 23:25 IST

येथील तहसीलदार नियमानुसार आपल्या जबाबदाऱ्या पार पाडीत नसल्याची तक्रार वकीलांनी केली असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

वसई : येथील तहसीलदार नियमानुसार आपल्या जबाबदाऱ्या पार पाडीत नसल्याची तक्रार वकीलांनी केली असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.वसईच्या तहसिल कार्यालयात तोतया कर्मचाऱ्यांचा प्रादुर्भाव वाढला असून, त्यांच्याकडून सर्वसामान्यांंची मोठ्या प्रमाणात फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यालयातील प्रत्येक कर्मचाऱ्यांना आपले ओळखपत्र गळ्यात बाळगण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी अ‍ॅड. किशोर म्हात्रे यांनी तहसिलदार गजेंद्र पाटोळे यांच्याकडे केली होती. मात्र, या गंभीर बाबीची दखल त्यांनी घेतली नाही. त्यामुळे म्हात्रे यांनी जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांच्याकडे ही मागणी केली. त्यांनी तात्काळ तसे आदेश तहसिलदारांना दिले.या आदेशाला एक वर्ष उलटून गेले आहे. तरीही हा आदेश पाळण्यात आलेला नाही. माहितीच्या अधिकाराखाली अ‍ॅड. म्हात्रे यांनी मागवलेल्या माहितीत ही माहिती उजेडात आली आहे. पाटोळे जर वरिष्ठांचे आदेश मानत नसतील तर सर्व सामान्यांना कोणता न्याय देत असतील असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. पाटोळे यांच्या या मनमानी कारभारामुळे नागरिकांना न्याय मिळणे तर दूरच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचाही अवमान होत असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)