शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

धगडीपाडा उपकेंद्र गेली १० वर्षे खाते आहे धूळ !

By admin | Updated: February 16, 2016 02:20 IST

विक्रमगड तालुक्यातील मौजे कुंर्झे ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या धगडीपाडा येथील आदिवासी परिसर गाव-खेडयातील रुग्णांसाठी शासनाने सन- २००६-७ मध्ये उपक्रेंद्रांची इमारत बांधलेली आहे़

राहुल वाडेकर ,  तलवाडाविक्रमगड तालुक्यातील मौजे कुंर्झे ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या धगडीपाडा येथील आदिवासी परिसर गाव-खेडयातील रुग्णांसाठी शासनाने सन- २००६-७ मध्ये उपक्रेंद्रांची इमारत बांधलेली आहे़ परंतु ती गेल्या १० वर्षापासून धूळखात पडून आहे. तिच्या अवती भवती गवताचे जाळे पसरलेल असून या उपकेंद्रांचा बांधल्यापासून १० वर्षात येथील गरीब खेडयातील जनतेला कोणताही उपयोग झालेला नाही़ आजही या लोकांना गावात उपकेंद्र इमारत असतांनाही दोन किलो मीटर खडतर रस्ता पार करुन कुंर्झे येथील आरोग्य केंद्रात जावे लागत आहे़ परंतु रात्री अतितातडीच्या रुग्णास हे धोकादायक असून जिवावर बेतणारे आहे़ याबाबत येथील ग्रामस्थांनी अनेकवेळा ग्रामसभेत केंद्र सुरु करण्यासंदर्भात ठराव घेवुन त्याची प्रत,तक्रारी अर्ज संबंधीत विभागात दिलेला असल्याचे येथील ग्रामस्थ सांगत असून अदयापही यावर काहीच उपाय योजना झालेली नाही़ धगडीपाडयाची लोकसंख्या अंदाजीत ५०० ते ६०० च्या आसपास आहे. जवळच आश्रमाळा असुन त्यामध्ये जवळ जवळ ६०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत़ परंतु या पाडयात आरोग्याची तशी कोणतीच सुविधा नाही त्यामुळे त्यांना एकमेव कुंर्झे आरोग्य केंद्रावर अवलंबून राहावे लागत आहे़ तर कुंर्झे आरोग्य केंद्रांत अगोदरच कोणत्याही प्रकारच्या योग्य अशा सुविधा नाही. जवळच जंगल भाग असल्याने रोजच संर्पदंशाचे रुग्ण येत असतांत परंतु या आरोग्य केंद्रात कोणत्याही योग्य अशा सुविधा नसल्याने तसेच आजूबाजूच्या पाडयातील व शहरांशी संपर्क करणारे रस्ते हे खूप खराब असल्याने रुग्णउपचार घेण्याअगोदरच दगावण्याची शक्यता जास्त असते़ तसेच दुर्गम खेडया-पाडयात शासन दरबारी नोेंद नसलेली कुपोषित बालके येतात व त्यांचे मृत्यू होत असतांत खेडयातील लोक गरीब अज्ञानानी असल्याने अशा प्रकारांची नोंद सरकारी दप्तरी होत नाही. कित्येक लोक सर्पदंशाचे शिकार होत असतांत़ कुंर्झंै आरोग्य केंद्रांत महत्वाची पदे रिक्त आहेत़ त्यासाठी येथील ग्रमास्थांना आंदोलनही करावे लागले होते, तर येथील उपलब्ध कर्मचाऱ्यांनाही दिवस-रात्रपाळी करुन दुसऱ्या दिवशी गाव-खेडयावर फिरतीही करावी लागते़ त्यामुळे येथील गाव-खेडयापाडयाती गरीब रुग्णांना योग्य आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाही़ याकडे प्रशासनाचे लक्ष नाही ग़्रामीण भागात बहुतेक ठिकाणी याच प्रकारची परिस्थिती असून आरोग्य सेवा योग्य प्रमाणात मिळत नाही हे लोक गरीब असल्याने त्यांना खाजगी डॉक्टरांची फी परवडणारी नसल्याने त्यांना आपल्या आजाराशी सामना करावा लागत़ याकडे शासनाने लक्ष घालून योग्य अशा सुविधा दयाव्यात अशी मागणी होत आहे़ (वार्ताहर)