शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीच्या बांधकामावरून वाद

By admin | Updated: March 25, 2017 01:00 IST

जांबुगाव येथील शिंगडपाडा येथील अंगणवाडी इमारत बांधताना जमिनीच्या हक्कावरून हरकत घेतल्याने स्थानिकांना लढा देण्याची वेळ

बोर्डी : जांबुगाव येथील शिंगडपाडा येथील अंगणवाडी इमारत बांधताना जमिनीच्या हक्कावरून हरकत घेतल्याने स्थानिकांना लढा देण्याची वेळ आली आहे. हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेल्याने बुधवारी ग्रामस्थांनी घोलवड पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली होती. जांबुगाव ग्रामपंचायती अंतर्गत शिंगडपाडा येथील अंगणवाडी इमारत मोडकळीस आल्याने आपला गाव आपला विकास याद्वारे दुरु स्तीसाठी कृतीआराखड्यात ठराव मंजूर करण्यात आला. त्यानुसार ६ लक्ष ६० हजाररूपयांचा मंजूर विकास निधी मार्च अखेर खर्च करावयाचा आहे. मात्र, प्रत्यक्ष बांधकामाला प्रारंभ करण्यापूर्वीच मयोद शहा यांनी जमिनीच्या मालकीवरून बांधकामास हरकत घेत सदर बांधकामाकरिता आग्रही असलेल्या कुणाल निमला आणि महेंद्र वंजारा या ग्रामस्थांविरु द्ध पोलीसात तक्र ार दाखल केली.या बाबत संबंधितांना घोलवड पोलिसांनी ठाण्यात बोलावल्याने बुधवार, २२ मार्च रोजी त्यांचे समर्थक असलेल्या ३०० ग्रामस्थांचा जमाव पोलीस ठाण्यात जमला होता. धिरजलाल जव्हेरचंद्र शहा यांनी १९८१ साली सर्वे नं. ४०३ हिस्सा क्र मांक ४ व ५ चे ० - १७ हेक्टर क्षेत्र जिल्हा परिषदेच्या भिणारी शाळेला दान दिल्याचे कागदोपत्री नमूद आहे. येथे सुमारे २५ वर्षांपूर्वी अंगणवाडी बांधण्यात आली होती. मात्र, गत काही वर्षांपासून ही इमारत मोडकळीस आल्याने शाळा लगतच्या धोडी यांच्या ओटीवर भरविण्यात येत होती. दरम्यान, पेसाअंतर्गत निधीतून अंगणवाडी इमारतीची दुरूस्ती हाती घेतल्यानंतर जमिनीच्या मालकीवरून मयोद धिरजलाल शहा यांनी हरकत घेतल्याने इमारत बांधकामात व्यत्यय निर्माण झाला आहे. या प्रकरणामुळे आंगणवाडी बंद पडल्याने शिक्षणावर परिणाम होत आहे. मात्र दुर्बल व वंचित घटकांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी शेवटपर्यंत लढा देणार असल्याचे या पाद्यावरील आदिवासींचे म्हणणे आहे. लोकप्रतिनिधी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी हा तिढा सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन स्थानिकांनी केले आहे. (वार्ताहर)