शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

वाहनचालकाचा मृत्यू, जनावरेही दगावली

By admin | Updated: March 5, 2016 01:12 IST

येथील परिसरात रात्रभर वीज, वादळीवाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे एका वाहनचालकाचा अपघाती मृत्यू झाला, तर वीज पडून एक गाय जागीच ठार झाली

मनोर : येथील परिसरात रात्रभर वीज, वादळीवाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे एका वाहनचालकाचा अपघाती मृत्यू झाला, तर वीज पडून एक गाय जागीच ठार झाली, तर दुसरा बैल बेशुद्धावस्थेत तसाच पडून आहे. वादळामुळे घराचे छप्पर उडून भिंत कोसळण्याने घरमालक जखमी झाल्याची घटना घडली. शेतकऱ्यांसह अनेकांचे अतोनात नुकसान झाल्याने सर्वांची तारांबळ उडाली आहे.गुरुवारी संध्याकाळी ७ वाजल्यापासून अचानक वादळी वारा सुटला. त्यानंतर, मुसळधार पावसाने सुरुवात केली. त्यामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चिल्हार गावाजवळ नादुरुस्त उभ्या असलेल्या वाहनाला धडक दिल्याने सुनील उत्तम सिंग (२१), रा. जम्मू-काश्मीर हा जागीच ठार झाला. दुसऱ्या घटनेत वाडाखडखोना येथे वीज पडून मिठ्या हडळ आदिवासी शेतकऱ्याची गाय जागीच ठार झाली. राजाराम भिवल्या याचा बैल बेशुद्धावस्थेत पडला आहे तसेच जाधवपाडा, किराट येथे वादळी वाऱ्याने घराचे पत्रे उडून भिंत कोसळल्याने काशिनाथ कृष्णा जाधव (५५) यास गंभीर दुखापत झाली आहे. पत्नी मंजू, मुलगा अजय, मुलगी सपना, साधना व प्रतीक्षा हे वाचले. अवकाळी वादळी पावसामुळे केव, सिलशेत, नालशेत, अपटीवाडा, विक्रमगड, जव्हार तालुक्यांतील अनेक गावांत शेतकऱ्यांनी वाळत टाकलेल्या तूळ, उडीत, वाळ, कडधान्य तसेच पावळी गवत ओलेचिंब झाले आहे. तसेच वीटभट्टी कारखान्यात कच्च्या विटा भिजल्याने त्यांचीही मोठी कुचंबणा झाली आहे. सध्या आर्थिक मंदी असून त्यातच निसर्गानेही आपले निसर्गमय वातावरण दाखवल्याने सर्वत्र लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मनोर पोलीस ठाण्यात मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा अधिक तपास मारोती पाटील सहा. पो.नि. करीत आहेत. तसेच नैसर्गिक आपत्ती झाल्याचे पंचनामे मंडळ अधिकारी नसटे व तलाठीवर्ग करीत आहेत. (वार्ताहर)