शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वीजवाहिनीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 22:56 IST

तक्रारी करूनही दखल नाही, अपघाताची भीती

खर्डी : खर्डी केंद्रात जिल्हा परिषदेच्या एकूण १८ प्राथमिक शाळा आहेत. त्यापैकी दोन शाळांचे छप्पर गळत असून स्टेशन येथील शाळा नं. ३ ला वीजवाहिनीमुळे धोका निर्माण झाला आहे. परिणामी, दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.स्टेशन येथील शाळेच्या वर्गखोल्या स्लॅबच्या असून त्यावरून वीजवाहिन्या गेल्या आहेत. शाळेच्या स्लॅबवर अर्ध्या फुटावर त्या लोंबकळत आहेत. त्यात संपूर्ण शाळेचे छप्पर गळत असल्याने संपूर्ण वर्गात ओल आली आहे. या लोंबकळणाऱ्या तारांमुळे शाळेत वीजप्रवाह उतरून मोठी हानी होऊ शकते. त्यामुळे शिक्षण विभागाने तातडीने उपाययोजना करून शाळेची होणारी हानी टाळावी. तसेच शाळेच्या मैदानात पाणी साचत असल्याने सर्वत्र चिखल झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना स्वच्छतागृहात जाण्यासाठी रस्ता राहिलेला नाही.वर्गखोल्यांच्या खिडक्या तुटलेल्या आहेत. शाळेचे गेट निखळले आहे. अशा अनेक समस्यांनी शाळा ग्रासली असून या शाळेतील विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांना जीव मुुठीत घेऊन शिकवावे लागत आहे.ही बाब गंभीर असून शिक्षण विभाग या शाळेत दुर्घटना घडण्याची वाट बघत आहे का, असा संतप्त सवाल पालक आणि ग्रामस्थ करत आहेत. या सर्व समस्या मुख्याध्यापक प्रेमनाथ दुभेले यांनी शिक्षण विभाग, पंचायत समिती, महावितरण, पोलीस ठाण्याकडे लेखी स्वरूपात दिल्या आहेत. तक्रार करून महिना उलटला तरी शिक्षण विभाग आणि महावितरणने कोणतीही दखल घेतली नाही.खर्डी केंद्रातील तळेखण येथील प्राथमिक शाळेतील वर्गखोल्यांचे छप्पर सिमेंटच्या पत्र्यांचे असून तेही ठिकठिकाणी फुटलेले आहे. त्यामुळे याही वर्गांमध्ये पाणी गळत आहे. या शाळेच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मुख्याध्यापकांनी वरिष्ठांकडे पाठवला आहे.शाळा नं ३ चे छप्पर गळत असून त्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठवला आहे. मात्र, अद्याप दुरुस्ती झालेली नाही. त्यासाठी पुन्हा शिक्षण विभागाकडे पत्रव्यवहार करून तातडीने छप्पर दुरुस्तीचे काम केले जाईल. तसेच या शाळेच्या इमारतीजवळ विजेच्या तारा लोंबकळत असून त्यामुळे शाळेला धोका निर्माण झाला आहे. त्या हटवण्याबाबत महावितरणला पत्र दिले आहे. - कमल वाळंज, केंद्रप्रमुख, खर्डी