शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाडा-कुडूसमध्ये वाढतेय दंडुकेशाही

By admin | Updated: February 15, 2017 04:27 IST

काही दिवसापूर्वी एका टेम्पो चालकाने विक्रमगड तालुक्यातील एका प्रतिष्ठित व्यक्तीला नाहक मारहाण केली होती.

वाडा : काही दिवसापूर्वी एका टेम्पो चालकाने विक्रमगड तालुक्यातील एका प्रतिष्ठित व्यक्तीला नाहक मारहाण केली होती. तर रविवारी सायंकाळी एस.टी. चालकाला व वाहकाला दंडुक्याने बेदम चोपले. या शिवाय भांडणाच्या किरकोळ घटना तर नेहमीच घडत असतात. मात्र त्यांच्याकडे डोळे झाक होतेय.ही मोठी बाजारपेठ असल्याने आजू बाजूच्या ५२ गांव खेडयातील नागरिक व किरकोळ व्यापारी खरेदीसाठी येथे येतात. सर्व बँका काही कार्यालय मराठी, हिंदी, इंग्रजी शाळा या निमित्ताने मोठया प्रमाणात माणसांची वर्दळ येथे असते. त्यातच येथील रस्ता रुंदीकरणाअभावी अपुरा असल्याने वाहनांची कोंडी होते. यातून रस्ता काढतांना अनेकवेळा वाहनांचा माणसांना कि ंवा दुसऱ्या वाहनाला धक्का लागतो. मात्र येथील स्थानिक याचा बाऊ करून भांडण उकरून दंडुकेशाही दाखवतात. यात पोलीसदेखील बघ्याची भूमिका घेतात. तर कधी तक्रार दाखल करून न घेता स्थानिकांना पाठीशी घालतात. एक महिला मुलाला घेऊन एस.टी.बस मधून उतरतांना बस थोडी हलली त्यामुळे तीने चालकाला फटकारले. यात दोघांची बोलाचाली झाली. वाहक समजविण्यासाठी खाली आला हे पाहून एका अज्ञात इसमाने दंडुक्याने दोघांना ठोकले पोलीसांनी गुन्हा दाखल न करता महिलेची व मारहाण करणाऱ्यांची बाजू घेवून चालक-वाहकाला वाटेला लावले. त्यामुळे एका सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले की म्हातारी मेल्याचे दु:ख नाही तर दंडुकेशहीला खतपाणी घातले जाते, हे वाईट आहे. भिवंडीतील घटना ताजी असतांना ही घटना घडल्याने नागरिकांत व चालक-वाहकांत चर्चेचा विषय झाला आहे.(वार्ताहर)