शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

दादडेची केंद्रशाळा शिक्षकाविना

By admin | Updated: March 5, 2016 01:13 IST

विक्रमगड तालुक्यातील दादडे येथील जिल्हा परिषद केंद्र्र शाळेतील ४०० विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ११ शिक्षक कार्यरत असून गेल्या १ मार्च २०१६ पासून एकही

तलवाडा : विक्रमगड तालुक्यातील दादडे येथील जिल्हा परिषद केंद्र्र शाळेतील ४०० विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ११ शिक्षक कार्यरत असून गेल्या १ मार्च २०१६ पासून एकही शिक्षक शाळेमध्ये हजर नसून ४०० मुलांची जबाबदारी येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या भरवशावर सोडून सर्व शिक्षक अधिवेशनाला गेले असल्याची माहिती हाती आल्यानंतर लागचीच तालुका श्रमजीवी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण पडवळे व शिष्टमंडळाने समक्ष शाळेमध्ये जाऊन पंचनामा केला आहे आणि त्याची प्रत गटविकास अधिकाऱ्यांना दिली असल्याची माहिती संघटनेकडून लोकमतला देण्यात आली आहे़विद्यार्थ्यांची गळती थांबावी, त्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावला जावा, यासाठी शासनाकडून तालुक्यातील प्रत्येक गाव-खेड्यापाड्यांत लोकसंख्येच्या निकषानुसार जिल्हा परिषद शाळा सुरू करण्यात आल्या आहेत़ परंतु, तालुक्यातील दादडे केंद्र शाळेतील ४०० विद्यार्थ्यांची जबाबदारी केवळ शाळा व्यवस्थापन समितीकडे सोपवून सर्व शिक्षक अधिवेशनाला गेले असल्याने पुन्हा एकदा जिल्हा परिषद शाळांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ गेल्या काही दिवसांपूर्वीच कासा (बु) केंद्र शाळेमध्ये हलगर्जीपणामुळे २५४ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची मोठी घटना अद्यापही ताजी असताना पुन्हा हा हलगर्जीपणाच झाला असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने केला आहे़ ही शाळा रस्त्यावरच असल्याने व शाळेमध्ये शिक्षक नसल्याने विद्यार्थी फिरताना दिसत आहेत. यामध्ये एखादी दुर्दैवी घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवाल श्रमजीवी संघटनेने उपस्थित केला आहे़ या दरम्यान श्रमजीवी संघटनेने जाब विचारला असता शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनंदा सुरेश कासट व सदस्य यांनी शाळेची जबाबदारी आमच्यावर सोपवून येथील सर्व शिक्षक अधिवेशनाला गेल्याचे सांगितले़ (वार्ताहर)