शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

लर्निंग लायसन्ससाठी विरारच्या आरटीओ कार्यालयात लोकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 00:41 IST

इंटरनेटअभावी त्रास : मुलाखतींच्या वेळी कोविड नियमांची दक्षता 

- मंगेश कराळेनालासोपारा : विरारच्या आरटीओ कार्यालयात लर्निंग लायसन्सच्या मुलाखतीसाठी लोकांची गर्दी होते. या लोकांची संगणक चाचणी वेळेत केली जाते. कधी-कधी इंटरनेटच्या कनेक्शनमुळे लोकांना त्रास सहन करावा लागतो, पण त्यांचे काम पूर्ण झाल्याशिवाय जात नसल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.कोरोनाच्या काळात ३ महिने विरारचे आरटीओ कार्यालय बंद होते. नंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेत आरटीओ कार्यालय सुरू करण्यात आले. कोरोनाच्या काळात दिवसाला ३२ लोकांचे लर्निंग लायसन्ससाठी मुलाखती घेऊन योग्य ती काळजी घेतली जायची.  लर्निंग लायसन्सकरिता येणाऱ्या प्रत्येकाला गेटवरच थांबवून तोंडाला मास्क बंधनकारक करत, त्याचे शरीराचे तापमान चेक करून, सॅनिटायझर केल्यावर फक्त एकालाच कार्यालयात पाठविले जायचे. १० मिनिटांनी तो आल्यावर दुसऱ्याला पाठवले जात असल्याचे ‘लोकमत’ला अधिकाऱ्याने सांगितले.आता दर दिवसाला सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत १७० ते १८० लर्निंग लायसन्ससाठी मुलाखती घेतल्या जातात. येणाऱ्या प्रत्येकाला मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांनी इंटरनेटमुळे त्रास झाल्याने लोकांना ताटकळत थांबावे लागत आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदे रिक्तलोकसंख्येच्या तुलनेत आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे. यांच्याच साह्याने विरारच्या आरटीओ कार्यालयातील कामकाज चालते. ३४ कर्मचारी, ३ शिपाई, १० अधिकारी असे एकूण ४७ अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहे. या ठिकाणी अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याचेही सूत्रांकडून कळते.२० ते २५ दिवसांत मिळते पक्के लायसन्स लोकांना पक्के लायसन्स पोस्टाने राहत्या पत्त्यावर २० ते २५ दिवसांत मिळते. आरटीओ कार्यालयात ५७ ड्रायव्हिंग स्कूल आणि डीलर २० ते २५ जण असून, यांचे प्रत्येकी एक किंवा दोन जण हजर असल्याने दलालांशी लोकांना संपर्क करण्याची गरजच भासत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, काही दलाल कार्यरत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.कोरोना काळात योग्य ती काळजी घेऊन लोकांच्या लर्निंग लायसन्सच्या मुलाखती सुरू आहेत. कोणालाही विलंब लागणार नाही, याची काळजी घेतली जाते. ड्रायव्हिंग स्कूल आणि डीलरचे प्रतिनिधी असल्याने दलालांचा प्रश्नच उद्भवत नाही.- प्रवीण बागडे, आरटीओ अधिकारी