शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डरकडून खंडणी मागणाऱ्यांविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: June 15, 2017 02:35 IST

अनधिकृत बांधकामप्रकरणी इमारतीमधीलच सात फ्लॅटधारकांनीच तब्बल पावणे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार एका नामांकित

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : अनधिकृत बांधकामप्रकरणी इमारतीमधीलच सात फ्लॅटधारकांनीच तब्बल पावणे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार एका नामांकित बिल्डरने केली आहे. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विरारमधील नामांकित बिल्डर आशुतोष जोशी यांच्या मोहक सिटी गृह संकुलातील हे सात फ्लॅटधारक आहेत. बिल्डर आणि फ्लॅटधारक पवन सरकाळे, देवेन कोचरेकर, राजन वझे, राजदीप दळवी, अनिष सावे, जयेश शाह, देवेंद्र गोंडले यांची वसई येथील एका हॉटेलमध्ये बैठक झाली होती. त्यावेळी सदर फ्लॅटधारकांनी तक्रारी न करण्यासाठी प्रत्येक २५ लाख रुपये मिळून १ कोटी ७५ लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच फ्लॅट विकून आम्ही निघून जाऊ असे फ्लॅटधारकांनी सांगितले होते. त्यावेळी खंडणी देण्यास नकार दिला असता पुढील प्रकल्प होऊ देणार नाही, अशी धमकी दिल्याची तक्रार जोशी यांनी केली आहे. तसेच खंडणीसाठी पैसे मागत असल्याची ध्वनीफित आणि व्हिडीओ चित्रीकरणही जोशी यांनी पोलिसांना पुरावा म्हणून सादर केले. त्यानंतर विरार पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. ही घटना वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने हा गुन्हा वसई पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी सांगितले. तर आपला गृहप्रकल्प अधिकृत असून सर्व शासकीय परवानग्या घेतलेल्या आहेत. असे असतांना सात जण खंडणीसाठी धमक्या देत होते, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, बनावट कागदपत्रे तयार करून इमारती बांधल्याप्रकरणी वसई विरार परिसरात दोनशेहून अधिक बिल्डरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील अनेक जण तुरुंगात जाऊन आले असून काही जण अद्याप तुरुंगात आहेत. तर खोटी कागदपत्रे तयार करणाऱ्या बिल्डरांची माहिती अधिकारात माहिती मागवून बिल्डरकडून खंडणी घेणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. त्यातच बिल्डरांना धमकावून मागितल्याप्रकरणी डॉ. अनिल यादव यांच्याविरोधात खंडणीचे चार गुन्हे दाखल झाले आहेत. सध्या डॉ. यादव गेल्या दोन महिन्यांपासून तुरुंगात आहेत. त्यांच्यानंतर गेल्याच आठवड्यात विरार पोलिसांनी एका खंडणी प्रकरणी महिला पत्रकार ज्योती तिवारीसह चार जणांना अटक केली होती.काय आहे प्रकरणजोशी यांच्या भागीदारीत असलेल्या व्ही. एस. एंटरप्राईझेस या कंपनीने विरार पूर्वेला पाच विंगच्या इमारती बांधल्या आहेत. यातील बी विंगमधील फ्लॅटधारक आणि बिल्डर यांच्यात वाद सुरु आहे.तेरा फ्लॅटधारकांनी बांधकामाप्रकरणी विविध विभागाकडून माहिती मागवली होती. त्यात अनियमितता असल्याच्या त्यांचा आरोप असल्याने त्यांनी विविध शासकीय विभागात बिल्डरविरोधात तक्रारी केल्या आहेत. याप्रकरणी जोशी यांची सदर फ्लॅटधारकांशी २२ डिसेंबर २०१५ रोजी जोशी यांच्या कार्यालयात बैठकही झाली होती. त्यावेळी कोणताही तोडगा न निघाल्याने बिल्डर आणि फ्लॅटधारकांमधील वाद चिघळला होता.