शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडचे न्यायालय लालफितीत

By admin | Updated: February 24, 2016 02:55 IST

दीड लाख लोकसंख्येच्या या तालुक्यासाठी न्यायालय मंजूर झाले असूनही आजपावेतो ते साकारले नाही. ते अद्यापही प्रश्न लालफितीतच आडकले आहे़ त्यामुळे आजही येथील नागरिकांना

- राहुल वाडेकर, तलवाडादीड लाख लोकसंख्येच्या या तालुक्यासाठी न्यायालय मंजूर झाले असूनही आजपावेतो ते साकारले नाही. ते अद्यापही प्रश्न लालफितीतच आडकले आहे़ त्यामुळे आजही येथील नागरिकांना आपल्या केसेस घेऊन जव्हार, वाडा किंवा भिवंडी येथील न्यायालयात खेटे मारावे लागत आहेत. गोरगरीबांच्या दृष्टीने ते खूप गैरसोयीचे व खर्चीक असल्याने स्वतंत्र न्यायालयाची निर्मिती लवकरात लवकर करण्यासाठी आमदार, खासदार व आदिवासी विकास मंत्री यांनी प्रयत्न करावे अशी एकमुखी मागणी येथील नागरिक करीत आहेत़ विक्रमगड तालुकया कार्यक्षेत्रात ग्रामपंचायत, ग्रामदानमंडळ व ग्रुप-ग्रामपंचायत असे मिळून एकुण ४२ स्वतंत्र ग्रामपंचायती आहेत़ गांवाची संख्या ९४ असून लोकसंख्या दीड लांखाच्या घरात आहे़ येथे पोलिस कार्यालय, तहसिल कार्यालय, पंचायत समिती, कृषी कार्यालये व तालुक्याची व्यापारी बाजारपेठ आहे. असे असूनही गेल्या १७ वर्षात स्वतंत्र न्यायालय नसल्याने येथील नागरिकांना पदरमोड करुन अन्य शहरांच्या ठिकाणी कोर्टाच्या कामासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत़ त्यामुळे दिवस, वेळ, पैसा यांचा अपव्यय होतो आहे.तालुक्याचा दिवसेंदिवस वाढता विस्तार व नागरीकरण पाहाता मंजूर असलेल्या या न्यायालयाची साकारणी तातडीने होण्याची आवश्यकता आहे़ तालुक्याकरीता स्वतंत्र न्यायालयाचा प्रस्ताव तयार आहे़ त्या करीता भूखंडही आरक्षित ठेवण्यांत आला होता त्याची पाहाणीही करण्यांत आली होती परंतु आजपावेतो त्याची अंमलबजावणी झालेली नाही़ जव्हार तालुक्यातून विभाजन करुन १९९९ मध्ये विक्रमगड तालुका स्वतंत्र करण्यांत आला़ तेंव्हा पासून येथे न्यायालय नाही त्यामुळे लवकरात लवकर न्यायालय कार्यान्वीत करावे अशी जनतेची मागणी आहे़