शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: वसई-विरार महापालिका परिसरामध्ये रक्ततुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 00:14 IST

रक्तदान शिबिरे आयोजित करावीत : पालिका प्रशासनाचे सामाजिक संस्थांना आवाहन

- आशिष राणेवसई : वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार शहर महापालिका हद्दीत रक्ततुटवडा भासू शकतो, असे लक्षात येताच महापालिका वैद्यकीय आरोग्य प्रशासनाने शहरांतील सामाजिक संस्थांना रक्तदान शिबिरे आयोजित करण्यासाठी परवानगी देण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. अशी शिबिरे आयोजित करणाऱ्या आयोजकांना आवाहन केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी लोकमतला दिली.सद्यस्थितीत कोविड-१९ विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाकडून 'ब्रेक दी चेन' अंतर्गत विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. तर थॅलेसेमियाच्या रुग्णांना नियमित रक्त संक्रमणाची आवश्यकता असते तसेच प्रसूती, अपघात, शस्त्रक्रिया इत्यादींसाठी आपात्कालीन परिस्थितीत रक्ताची आवश्यकता असते. किंबहुना राज्यात व वसईतही रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त करत शहरातील विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, गृहनिर्माण संस्था, राजकीय, धार्मिक संस्था इ. आयोजकांमार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात असते. त्यानुसार कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्र शासनाने राज्यात सर्वत्र निर्बंध लागू केलेले आहेत. परंतु, या निर्बंधातून वैद्यकीय व आरोग्यसेवा यांना सूट देण्यात आलेली आहे. तसेच रक्त संक्रमण सेवेलाही या निर्बंधातून सूट देण्यात आलेली आहे.दरम्यान, आयोजकांकडून रक्तदान शिबिरे ही साधारणत: शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवशी आयोजित केली जातात. तसेच आता रक्ताची गरज असल्याने रक्तदान शिबिरे आयोजित करण्यासाठी परवानगी देण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांनी ६ एप्रिल रोजी पत्र निर्गमित केले आहे. त्यानुषंगाने वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात आयोजकांनी कोविडसंदर्भात दिलेल्या व रक्तदान शिबिरे आयोजित करण्यासाठी जारी केलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे व नियमांचे पालन करून तसेच महापालिका वैद्यकीय आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन यांची परवानगी घेऊन रक्तदान शिबिरे आयोजित करावी, असे आवाहन वसई- विरार शहर महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.प्रसूती, अपघात, शस्त्रक्रिया इत्यादींसाठी आपात्कालीन परिस्थितीत रक्ताची आवश्यकता असते. राज्यात व वसईतही रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे, यासाठी आवाहन करण्यात आले आहे.