शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown News: वसईतील व्यापाऱ्यांची पालिकेवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 00:41 IST

दुकाने बंद ठेवण्याच्या निर्बंधांना विरोध : उपासमारीची वेळ येण्याची भीती

विरार : वसई-विरार महापालिकेने ३० एप्रिलपर्यंत दुकाने बंद ठेवण्याच्या घातलेल्या निर्बंधांना विरोध म्हणून शहरातील व्यापाऱ्यांनी बुधवारी दुपारी पालिकेवर धडक दिली. राज्य सरकारने सुरुवातीला सकाळी ७ ते संध्याकाळी ८ पर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची मुभा दिली होती; मात्र वसई-विरार महापालिकेने मंगळवारी जाहीर केलेल्या नियमावलीत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने ३० एप्रिलपर्यंत पूर्णतः बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारच्या या निर्बंधांमुळे उपासमारीची वेळ येणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.मागील वर्षी कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे एक वर्ष दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी सरकारला सहकार्य केले आहे; यापुढे मात्र व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवणे परवडणारे नाही. त्यामुळे पालिकेने हे निर्बंध शिथिल करून व्यापाऱ्यांना दुकाने सुरू ठेवण्याची मुभा द्यावी, या मागणीसाठी वसई-विरारमधील व्यापाऱ्यांनी पालिकेवर ही धडक दिली होती. वसई-विरार शहरात पाच हजारपेक्षा जास्त व्यापारी आहेत. विविध व्यवसायात असलेल्या या व्यापाऱ्यांकडे भाडेतत्त्वावरील दुकाने आहेत. याशिवाय दुकानातील नोकर-चाकर, वीजबिल आणि व्यवसायात लागलेले लाखो रुपये, त्यासाठी काढलेली कर्जे याने हे व्यापारी मेटाकुटीस आलेले असतानाच पुन्हा एकदा त्यांच्यावर निर्बंध लादले गेल्याने पालिकेविरोधात प्रचंड प्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे. दरम्यान; वसई-विरार महापालिका मुख्यालयात मनाई आदेश लागू असल्याने पालिका आयुक्त गंगाथरन डी. यांनी या व्यापाऱ्यांची भेट घेण्यास नकार दिला.