शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: वसईत १० हजार ४७९ रुग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 01:00 IST

एकूण बाधित रुग्ण १३,६७७ : उपचार घेताहेत २,९०९

विरार : पालघर जिल्ह्यातील वसई-विरार महानगरपालिका हद्दीमध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घबराट निर्माण झालेली असतानाच आजवर या जीवघेण्या आजारातून १० हजार ४७९ रुग्णांनी मात करण्यात यश मिळवले आहे. एकूण रुग्णबाधितांची संख्या १३ हजार ६७७ झालेली असताना घरी परतलेल्यांचे प्रमाण दिलासादायक ठरले आहे. दरम्यान, केवळ दोन हजार ९०९ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.वसई-विरार महानगरपालिका हद्दीमध्ये मध्यंतरीच्या काळात मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आले होते. दिवसभरात ज्या संख्येने रुग्ण आढळत होते, ते पाहता पालिका हद्दीतील शहरांमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अद्यापही लोकांमध्ये ही भीती कायम आहे, मात्र तरीही अलीकडच्या काळात पालिकेच्या आरोग्य यंत्रणेने ज्या पद्धतीने कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत, ते खरोखरच कौतुकास्पद आहेत. त्याचीच प्रचीती म्हणून सध्या पालिका हद्दीतील साडेदहा हजारहून जास्त रुग्णांनी या आजारावर मात करण्यात यश मिळवले आहेत.वसई, नालासोपारा आणि विरार तसेच नवघर-माणिकपूर या शहरांमधील बहुसंख्य नागरिक रोजीरोटीसाठी मुंबई, ठाणे आदी ठिकाणी जात असतात. वसईत पहिला रुग्ण जरी परदेशातून आलेला आढळला होता, तरी पुढील काळात नालासोपारा, विरार तसेच वसई भागात आढळलेले बहुसंख्य रुग्ण हे मुंबई-ठाण्यात नोकरीधंद्यानिमित्त आलेले असल्याचे स्पष्ट झालेले आहे. पुढे त्या त्या रुग्णांच्या कुटुंबातील आणि संपर्कातील अन्य लोकांनाही कोरोनाबाधा झाल्याने महापालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला होता, मात्र आता महापालिकेने रुग्ण आढळणाऱ्या ठिकाणी कंटेनमेंट झोन जाहीर करीत प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आलेले आहे. त्यामुळेच बरे होणाऱ्यांच्या मोठ्या संख्येबरोबरच उपचार घेणाºयांची घटलेली संख्याही चिंता कमी करणारी आहे.वसई-विरार महापालिका हद्दीमध्ये एकूण रुग्णबाधितांची संख्या १३,६७७ झालेली असताना घरी परतलेल्यांचे प्रमाण दिलासादायक ठरले आहे.दरम्यान, केवळ २,९०९ रुग्ण शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या