शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात लसीकरण केंद्रांवर गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 23:55 IST

जव्हारमध्ये दिवसभरातील लसीकरण बंद : बाहेरील व स्थानिकांचा गोंधळ शिगेला

जव्हार : जव्हारच्या कुटीर रुग्णालयात कोविड लसीकरण केंद्रावर सोमवारी सकाळी बाहेरील व स्थानिकांच्या लसीकरणावरून गोंधळ उडाला. गोंधळ इतका वाढला की, रुग्णालय यंत्रणेला पोलिसांना बोलवावे लागले.

१ मे पासून १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांच्या कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र, दोन दिवस सुटी असल्याने नोंदणी केलेल्या नागरिकांना लसीकरण करता आले नाही. परंतु ३ मे रोजी सोमवारी जव्हार येथील कुटीर रुग्णालयात लसीकरणाला सुरुवात झाली. परंतु पहिल्याच दिवशी जव्हारच्या लसीकरण केंद्रावर बाहेरील जिल्ह्यातील व तालुक्यातील नागरिकांनी याच ठिकाणी ऑनलाईन नोंदणी करून कोरोना लसीकरण केंद्रावर गर्दी करून गोंधळ उडवून दिला. त्यानंतर जव्हार भागातील नागरिक संतप्त झाल्याने लसीकरण केंद्र बंद केले.

जव्हारच्या लसीकरण केंद्रात रविवार दि. २ मे रोजी १३०० लसींचा डोस पुरविण्यात आला आहे. सेल्फ ऑनलाईन रजिस्ट्रेशनमुळे कोणीही कुठलेही केंद्र निवडू शकतो, असे पर्याय देण्यात आले आहेत. त्यामुळे सोमवार सकाळपासून सेल्फ ऑनलाईन नोंदणी करणारे मुलुंड, अंधेरी, ठाणे, वसई, विरार आदी भागातून जवळपास १५० लोक लसीकरण करण्यासाठी थेट जव्हारला आले होते. त्यामुळे स्थानिक आणि बाहेरून आलेल्या नागरिकांत वाद निर्माण झाला. यावेळी स्थानिक पोलिसांना सुद्धा पाचारण करण्यात आले. यावेळी तहसीलदार संतोष शिंदे यांनासुद्धा बोलविण्यात आले होते.वाद वाढून काही वेळातच भांडणाचे स्वरूप निर्माण झाले. मात्र, पोलिसांनी तातडीने गोंधळ शमविला. यावेळी शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष व शिष्टमंडळ यांची वैद्यकीय अधीक्षक डॉ. मराड यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. मिलिंद चव्हाण यांच्याशी संपर्क साधला त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून वस्तुस्थिती सांगितली. जिल्हाधिकारी यांनी एका दिवसासाठीचे लसीकरण बंद करण्याचे आदेश दिले.

१) ऑनलाइन लसीकरण नोंदणी करताना, केंद्र निवडताना तालुक्याची किंवा जवळपासच्या अंतराची मर्यादा घालण्यात यावी, जेणेकरून स्थानिक लोकांना वेळेवर लस उपलब्ध होण्यास मदत होईल.- दिनेश भट, माजी नगराध्यक्ष, जव्हार

शासनाच्या धोरणानुसार ज्यांची नोंदणी करण्यात आली आहे अशा व्यक्तीला लस द्यावी लागते. मात्र, जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सोमवारचे लसीकरण बंद करण्याचे आदेश आल्यामुळे केंद्र बंद करण्यात आले आहे.- डॉ. रामदास मराड, वैद्यकीय अधीक्षक, कुटीर रुग्णालय, जव्हार

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCorona vaccineकोरोनाची लस