शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

गणेशमूर्ती विसर्जनानंतर खतनिर्मिती; ‘ग्रीन गणेश’ संकल्पना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 00:47 IST

विरारमधील मूर्तिकाराची नवीन कल्पकता

पारोळ : यंदा गणेशोत्सवावर कोरोना विषाणूचे सावट असल्याने हा उत्सव साधेपणाने साजरा होणार आहे. हा उत्सव साजरा करताना त्याचा फायदा निसर्ग वा कृषीला व्हावा, यासाठी एका मूर्तिकाराने या मूर्तीच्या विसर्जनातून खत तयार होणारी मातीची मूर्ती बनवली असून गणेशमूर्ती घडवताना त्याने नवीन कल्पनेची जोड दिली आहे.निसर्गरक्षणाचा दिवस साजरा करीत असताना माणसाच्या प्रत्येक कृतीतून निसर्गालाच देवत्व बहाल करून पर्यावरणाचा समतोल कसा साधला जातो, याचे उत्तम उदाहरण विरार येथील एक कलावंत परेश घाणेकर यांनी आपल्या गणेशमूर्तीच्या अभिनव कल्पनेतून घालून दिले आहे. अलीकडे पर्यावरणपूरक गणपतीच्या मूर्तींना प्रचंड मागणी असताना शाडूच्या आणि लाल मातीच्या मूर्ती अनेक अडचणींवर मात करून मूर्तिकार घडवीत आहेत. लाल माती ही पर्यावरणपूरक असून तिच्यामध्ये बी रुजवून मूर्तीच्या विलयानंतर उरलेल्या मातीचा वापर कल्पकतेने झाडांना खत म्हणून करण्याची कला या मूर्तीतून साधण्यात आली आहे.यंदा कोरोनामुळे गणेशोत्सवाला मर्यादा आल्या असून मूर्तीचे आगमन आणि विसर्जनासाठी मिरवणुकांवर बंदी आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन केवळ शाडूच्या पर्यावरणपूरक मूर्ती बनविणे पुरेसे नाही, तर ही मूर्ती कृषी पर्यावरणाला कशी पूरक ठरेल हे पाहणे महत्त्वाचे आहे, हे लक्षात घेऊन ‘ग्रीन गणेश’ संकल्पनेतून बनविलेल्या मूर्तीत विविध झाडांच्या बिया मिसळण्यात आल्या आहेत. ही मूर्ती गणेशोत्सवानंतर घरच्या घरी मोठ्या टबमध्ये विसर्जित केल्यावर मूर्तीची माती विरघळते व तिचे खतात रुपांतर होते. हे खत कृषी लागवडीसाठी वापरण्यात येते, असे मूर्तिकार परेश घाणेकर यांनी सांगितले.