शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाकडून अपूर्ण रस्त्यावर पूर्णत्वाची पाटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 02:44 IST

वसई व वाडा तालुक्यांना जोडणारा भालिवली-निंबवली मार्ग गत चार वर्षांपासून ‘वर्क इन प्रोग्रेस’ अवस्थेमध्ये असताना ठेकेदाराने मार्ग पुर्ण

सुनिल घरत पारोळ : वसई व वाडा तालुक्यांना जोडणारा भालिवली-निंबवली मार्ग गत चार वर्षांपासून ‘वर्क इन प्रोग्रेस’ अवस्थेमध्ये असताना ठेकेदाराने मार्ग पुर्ण झाल्याचा बोर्ड लावून शासन व ग्रामस्थांची फसवणूक केली आहे. जे काही काम त्याने केले आहे ते निकृष्ट दर्जाचे असल्याने यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे.पावसाळयात तानसा नदीवरील उसगाव, मेढे हे पूल पाण्याखाली जाऊन पलीकडील १५ गावांचा संपर्क तुटतो. याकाळात विध्यार्थी व नोकरदारांची गैरसोय होते. यावर तोडगा म्हणून जानेवारी २०१४ मध्ये ग्रामसडक योजने अंतर्गत भालीवली-निबवली या मार्गाचे काम हाती घेण्यात आहे. या मार्गाच्या कामाचा ठेका मेमर्स वितरांग कंन्स्ट्रशन कंपनी मुंबई यांना देण्यात आले आहे. या कामाचा पूर्ण करण्याचा कालावधी १८ महीने असताना चार वर्ष पूर्ण झाले आहेत. तरी तो पूर्ण झालेला नाही. गेल्या चार वर्षात मुंबई अहमदाबाद महामार्गाचे चौपद्रीकरण झाले असताना हा मार्ग का पूर्ण होत नाही, कामाचा दर्जा का राखला गेला नाही, ग्रामसडक योजनेच्या अभियंत्यांनी काय कारवाई केली असा सवाल विचारला जात आहे. हा मार्ग अपूर्ण असतानाही, केलेल्या कामाचा दर्जा खराब आहे. खडी न वापरता खडा, व डांबरा बरोबर केमीकल चा वापर केला जात असल्याने हा मार्ग पूर्ण झाला तरी टिकेल का असा सवाल आडणे येथील बबन जाधव यांनी विचारला आहे.