शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

सरकारविरोधात कम्युनिस्टांचा मोर्चा

By admin | Updated: May 9, 2017 00:15 IST

कॉ.गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोळकर, प्रा.कलबुर्गी यांची हत्या होऊन अनेक महिने उलटले तरी आरोपींना पकडण्यात सरकारला यश आलेले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड : कॉ.गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोळकर, प्रा.कलबुर्गी यांची हत्या होऊन अनेक महिने उलटले तरी आरोपींना पकडण्यात सरकारला यश आलेले नाही. तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते पुणे जिल्हा सचिव कॉ. अजित अभ्यंकर यांच्यावर पार्सल बॉंम्ब पाठविणाऱ्यांना अटक करा. या मागण्यांसाठी व केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने मोर्चा काढला होता. जिल्हा कमिटी मेंबर कॉ. राजा गहला, कॉ. अमृत भावर, कॉ.ताई बेदर, विक्र मगड तालुका सचिव कॉ. किरण गहला, कामगार नेता कॉ. विनोद निकुळे, शेतकरी नेते कॉ. चंद्रकांत गोरखना यांनी त्याचे नेतृत्व केले होते. यावेळी विक्र मगड तालुका सचिव कॉ. किरण गहला यांनी सांगितले की, देशात आणि राज्यात जर खरोखर लोकशाही असेल व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी साकारलेल्या घटनेचे पालन करायचे असेल तर आमच्या मागण्या मान्य करा. विक्र मगड तालुक्यातील डोल्हारी खुर्दमध्ये काही दिवसापूर्वी अंगणवाडी कार्यकर्तीची निवड मतदान पद्धतीने पार पडली. निवडून आलेल्याचासत्कार करून घोषित केले. तरीसुद्धा सत्तेत असलेल्या भाजपच्या सरपंचानी ठराव मंजूर करण्यासाठी चालढकल चालविली आहे. मग लोकशाही आहे तरी कुठे. असा सवाल त्यांनी केला. बाबासाहेबांनी लिहिलेली राज्यघटना व लोकशाही मोडीत काढण्याचे षडयंत्र भाजप प्रणित सरकार करीत असून सामाजिक चळवळी करणाऱ्या नेत्यांची हत्या केली जाते, काही नेत्यांच्या हत्येचा प्रयंत्न केला जातो मात्र आरोपी अजूनही मोकाट फिरत असून त्यांना अटक करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार काहीच करीत नसल्याने या सरकारचा जाहीर निषेध प्रत्येक लोकशाहीप्रेमी नागरिकाने केला पाहिजे.