शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक तंत्राद्वारे रंगीबेरंगी कलिंगड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 23:24 IST

वाड्यातील देवघरमधील प्रफुल्ल पाटील या शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग

लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : तालुक्यात अनेक प्रयोगशील शेतकरी शेतामध्ये विविध प्रयोग करून पारंपरिक शेतीला छेद देत अत्याधुनिक शेती करू लागले आहेत. हे शेतकरी आपल्या शेतामध्ये फळे, फुले, भाजीपाला अशी उत्पादने घेऊ लागले आहेत. असाच एक अनोखा प्रयोग देवघर येथील प्रफुल्ल पाटील या शेतकºयाने केला आहे. आपल्या पाच एकर जागेत रंगीबेरंगी कलिंगड व दहा गुंठा जागेत पॉली हाऊस करून सिमला (ढोबळी) मिरचीची लागवड केली असून त्यात त्यांना यश आले आहे. यासाठी या शेतकºयाने ठिबक सिंचन आणि मल्चिंग तंत्राचा वापर केला आहे.यासाठी पाटील यांनी शेताची नांगरणी करून माती भुसभुशीत केली व त्यात सºया ओढून त्यावर मल्चिंग टाकले. त्यानंतर त्यात बी-बियाणे लावून संपूर्ण शेतीत ठिंबक सिंचन केले. त्यांनी आपल्या शेतात दोन जातीच्या कलिंगडची लागवड केली आहे. बी लागवडीपासून ९० दिवसांत हे पीक तयार झाले आहे. मल्चिंग आणि ठिंबक पद्धतीने ही शेती केल्याने मनुष्यबळ अगदी कमी झाले. एक-दोन माणसं हे सर्व करत असल्याचे पाटील यांनी सांगितले.कलिंगडावर कोणत्याही रोगाचा प्रभाव पडू नये यासाठी त्यांनी फळमाशी पकडण्यासाठी साफळे लावले असून, त्या सापळ्यात माशी आपोआप अडकते. यासोबतच त्यांनी शेतामध्ये चिकट पॅट लावला आहे. त्याला चिकटलेली माशी पाहता पिकावर कोणती कीटकनाशक फवारणी करायची हे लक्षात येते व पिकावरील रोगाचे प्रमाण शून्य होऊन चांगले उत्पादन मिळते, असे पाटील यांनी सांगितले. त्यांनी औषधे व खतेही ठिबक सिंचनातून दिली आहेत. पूर्वी गोणीमध्ये खत द्यावे लागायचे, मात्र आता वेंच्युरीमधून खते दिली जात असल्याने खताचे प्रमाणही कमी लागत आहे. तसेच कमी पाण्यात पीक घेता येत असल्याचे ते म्हणाले. तसेच ते रंगीबेरंगी ढोबळी मिरचीचे उत्पादन घेत आहेत. या ढोबल्या मिरच्या लाल, पिवळी व हिरवी अशा तीन रंगात आहेत. रिझवान या वानाची मिरचीची १० गुंठे जागेत ४ हजार झाडे लावली आहेत. ढोबळी मिरची इन्सेट नेटमध्ये लागवड केली आहे.सध्या ते पिवळ्या व हिरव्या अशा दोन रंगात कलिंगडाचे उत्पादन घेत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे ते उत्पादन घेत असलेल्या पिवळ्या कलिंगडात आतील गर लाल आहे. तर हिरव्या कलिंगडातील आतील गर पिवळा आहे. या शिवाय ही कलिंगडे चौकोणी, लव्ह आकाराची तयार केली आहेत. त्यांच्या शेतातील एक कलिंगड तीन ते चार किलो वजनाचे असून १८ ते २० किलोचा भाव आहे.