शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

बचतगटांची पिळवणूक

By admin | Updated: March 25, 2017 01:07 IST

काम देण्याच्या नावाखाली वसई विरार महापालिकेकडून महिला बचत गटांची पिळवणुक सुरु असून वेठबिगरासारखे राबवून घेणाऱ्या

वसई : काम देण्याच्या नावाखाली वसई विरार महापालिकेकडून महिला बचत गटांची पिळवणुक सुरु असून वेठबिगरासारखे राबवून घेणाऱ्या या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी उत्तरांचल वेल्फेअर असोसिएशनने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याप्रकरणी लोकमतने आवाज उठवला होता. त्याची दखल घेऊन असोसिएशनने मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.वसई विरार महापालिकेच्या मालकीची १३८ उद्याने असून त्याच्या देखभालीचा ठेका ८३ बचत गटांना दिला आहे. याठिकाणी उद्यानाची दैनंदिन स्वच्छता, उद्यान वेळेत उघडणे-बंद करणे, झाडलोट करणे, वृक्ष छाटणई करणे, दिवे सुरु-बंद करणे, व्यायामाचे साहित्याची देखभाल करणे, उद्यानाची नीट निगा राखणे आदी कामे महिला बचत गटांवर सोपवण्यात आली आहेत. ही उद्याने सकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरु असतात. या सर्व कामांसाठी देण्यात येणारे मानधनही अतिशय तुटपुंजे आहेत, अशी तक्रार असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश सभापती यांनी केली आहे. मानधन देण्यासाठी महापालिकेने उद्यानांची वर्गवारी केली आहे. साडेचार हजार चौरस मीटरपेक्षा जास्त असलेल्या उद्यानाला ए प्लस, २ हजार ते साडेचार हजार चौमी उद्यानाला ए, पाचशे ते दोन हजार चौमी उद्यानाला बी आणि त्याखालील उद्यानाला सी वर्ग अशी वर्गवारी करण्यात आली आहे. या वर्गवारीनुसार ए प्लसला ५२ हजार ९००रुपये, ए वर्गाला ३९ हजार ६७५ रुपये, बी वर्गाला २६ हजार ४५० रुपये आणि सी वर्गाला १३ हजार २२५ रुपये मानधन दिले जाते. यावरुन आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. इतक्या कमी मोबदल्यात उद्यानांची देखभाल करणे महिला बचत गटांना अतिशय कठीण होऊ लागले आहे.सर्वात कमी क्षेत्रफळ असलेल्या उद्यानाची देखभाल करण्यासाठी किमान चार माणसांची गरज लागते. सकाळ-संध्याकाळ या दोन्ही वेळच्या कामासाठी चार माणसांना किमान मानधन म्हणून दररोज प्रत्येकी दीडशे रुपये द्यावे लागतात. त्यामुळे महिला बचत गटाला दरमहा १८ हजार रुपये मोजावे लागतात. वर्गवारीनुसार माणसांची संख्या वाढत असल्याने खर्चही वाढतो. त्यामुळे सध्या दिले जाणारे मानधन परवडत नसल्याने महापालिका महिलांची आर्थिक फसवणुक करीत असल्याचा आरोप प्रजापती यांनी केला आहे.