शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

हवामान बदलामुळे झेंडूचे उत्पन्न मंदावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 23:31 IST

हरभरा उत्पादन घटले; वाड्यामधील शेतकऱ्यांचा फुलशेतीकडे वाढला ओढा

वाडा : वाड्यातील गातेस गाव खरे तर हरभरा लागवडीसाठी प्रसिद्ध, मात्र लहरी हवामानामुळे हरभºयाचे चांगले उत्पन्न होत नाही. यामुळे गेल्या काही वर्षांपासून येथील शेतकरी झेंडूच्या फुलशेतीकडे वळले आहेत. या गावातील जवळपास १५ ते २० शेतकरी फुलशेती करतात. या ठिकाणी उत्पादित केलेल्या फुलांना सुरत आणि दादर येथे चांगली बाजारपेठ आहे. मात्र हवामानातील बदलामुळे यंदा झेंडूचे उत्पन्न मंदावले आहे.स्थानिकांना आणि बेरोजगारांना औद्योगिकीकरणामुळे रोजगार मिळेल, अशी आशा होती. मात्र वाड्यातील कारखाने कधी उघडले आणि कधी बंद झाले हे लोकांना कळलेही नाही. आता लोकांनी दिलेल्या जागी फक्त बंद सांगाडे उभे असून बेरोजगारी ही समस्या कायमस्वरूपी वास्तव्यास राहिली. मात्र असे असतानाही गातेससारख्या गावातील शेतकरी व विशेषत: महिलांनी झेंडूची लागवड करून अस्सल मातीचा गंध आणि रंग आपल्या जीवनात आणला असून खूप फायदेशीर नसला तरी हक्काचा रोजगार उपलब्ध केला आहे.गातेस खुर्द याच गावातील विशाखा पाटील यांनीही सहकारी रामचंद्र पाटील यांच्यासोबत १९ हजार झेंडूच्या रोपांची लागवड केली असून यासाठी त्यांना एक लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च आला आहे.डिसेंबर महिन्यात या रोपांची लागवड केली असून मार्च महिन्यापर्यंत फुलांचे उत्पन्न मिळणार आहे. दोन ते तीन दिवसांत त्यांना जवळपास १२०० किलो फुले तोडावी लागतात. ज्यांना सध्या २० ते २५ रुपये किलो दराने भाव मिळतो. खरे तर हा भाव म्हणजे निव्वळ चेष्टा असून असाच भाव राहिला तर मात्र यातून काहीही नफा मिळणे अवघड आहे.चांगला भाव असला तर तीन महिन्यात एक ते दीड लाख रुपये निव्वळ नफा मिळतो. मात्र या वर्षी उशिरापर्यंत रेंगाळलेला पाऊस, सतत ढगाळ असलेले वातावरण यामुळे रोगराई व औषधोपचार यावर खर्च वाढून उत्पन्न देखील कमी होण्याची शक्यता विशाखा पाटील यांनी व्यक्त केली आहे.