शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

आडवळणी पण निसर्गसंपन्न ऐतिहासिक गुंज परिसर

By admin | Updated: May 3, 2016 00:38 IST

गुंज हे भिवंडी वाडा महामार्गावर असलेल्या कुडूस गावापासून साधारणपणे १०-१२ कि.मीवर असलेले छोटेसे गाव. दोन्ही बाजूला शेती आणि शेताच्यामधून एकावेळी एक वाहन जाऊ शकेल

- वसंत भोईर,  वाडा

गुंज हे भिवंडी वाडा महामार्गावर असलेल्या कुडूस गावापासून साधारणपणे १०-१२ कि.मीवर असलेले छोटेसे गाव. दोन्ही बाजूला शेती आणि शेताच्यामधून एकावेळी एक वाहन जाऊ शकेल असा रस्ता. कौलारु घरे आणि घरापुढे असलेले अंगण हे दृश्य आपल्याला गुंज गावात जाईपर्यंत दृष्टीस पडत असते. हे दोन भागात विभागले आहे, गाव आणि कोठी.हे गाव इतर गावांसारखेच. पण या गावाने आपल्या पोटात सामावून घेतला आहे पेशव्यांचा इतिहास. या गावाने अनुभवला आहे चिमाजी आप्पांचा सहवास. गावाने ऐकले आहेत चिमाजी आप्पांनी सैन्याला व सरदारांना दिलेले आदेश आणि मुख्य म्हणजे चिमाजीआप्पांनी वज्रेश्वरी देवीला नवस केला तो सुद्धा याच गावात. काळाच्या ओघात गावकरी गुंज गावाला असलेली ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि चिमाजी आप्पांना विसरले असतील, पण गावात असलेले पेशवेकालीन परशुराम उर्फ भार्गवरामाचे मंदिर, डोंगराच्या पायथ्याशी असलेले तळे व त्याच्या काठावरती असलेले मंदिराचे भग्न अवशेष आणि वज्रेश्वरी देवीचे मूळ देवस्थान यांच्या रूपाने चिमाजी आप्पांचा इतिहास अजूनही जिवंत आहे. गावातील या पार्श्वभूमीचा गावकऱ्यांनी पर्यटन व त्यातून अर्थार्जनासाठी वापर केल्यास येथील आर्थिक परिस्थिीती सुधारुन गावकऱ्यांना उपजिवीका मिळेल. (वार्ताहर)भार्गव अर्थात परशुराम मंदिरगुंज गावात असलेले भार्गवरामाचे मंदिर एक टेकडीवर असल्यामूळे लांबूनच आपले लक्ष वेधून घेते. परशुरामांना भार्गवराम या नावाने सुद्धा ओळखले जाते. गावाच्या टोकाला असलेल्या तलावाजवळून जाणारी पायवाट आपल्याला भार्गवरामाच्या मंदिरात आपल्याला घेऊन जाते. हा तलाव आॅक्टोबर-जानेवारीमध्ये कमळासारख्या फुलांनी आणि पानांनी भरून गेलेला असतो. पण ही कमळाची फुले नसून ‘वॉटर लिली’ या प्रकारातील पाणफुले आहेत.फुलांचे हे सौंदर्य काठावरून अनुभवायचे आणि तलावाजवळ असलेले मंदिराचे अवशेष (आता फक्त चौथरा आणि आणि कोरीवकाम केलेले काही दगड) बघून भार्गवराम मंदिराच्या दिशेने आपले पाऊले वळतात. मंदिराच्या अवशेषांवरून हे मंदिर १३ व्या शतकातील वाटते.भार्गवराम मंदिर एका टेकडीवर असून मंदिराकडे जाणारी पायवाट चांगली मळलेली आहे. पायवाटेच्या दोन्ही बाजूला झाडे असल्यामुळे वाट चढताना थकवा जाणवत नाही. तळ्यापासून मंदिरापर्यंत पोहोचायला १५-२० मिनिटे लागतात. भार्गवरामाचे मंदिर उत्तराभिमुखी असून जांभा दगडात बांधले आहे. मंदिरातून बाहेर येताच आजूबाजूचा परिसर मन प्रफुल्लीत करते. मंदिराजवळून दिसणारे १५ ते २० घरांचे गुंज गाव, गावाच्या पाठीमागे असलेला तलाव हे दृश्य फार सुंदर दिसते. मंदिराजवळ मोठी झाडे आणि झुडुपे असल्यमुळे अनेक प्रकारची फुलपाखरे आणि रानफुले दृष्टीस पडतात.