शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पालघरमध्ये नोकरीच्या आमिषाने फसवणूक

By admin | Updated: May 7, 2016 00:45 IST

आपल्या सार्वजनिक बांधकाम विभाग अंधेरी (मुंबई)मध्ये नोकरी मिळवून देतो असे सांगून पालघरमधील कपिल मधूसुदन पाटील, रा. माहीम रोड, पालघर यांच्याकडून ७ लाख २ हजाराची

पालघर : आपल्या सार्वजनिक बांधकाम विभाग अंधेरी (मुंबई)मध्ये नोकरी मिळवून देतो असे सांगून पालघरमधील कपिल मधूसुदन पाटील, रा. माहीम रोड, पालघर यांच्याकडून ७ लाख २ हजाराची रक्कम घेऊन त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी कनिष्ठ लिपिक भरत लक्ष्मण शेलार यांच्या विरोधात पालघर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रानुसार पालघर माहीम रस्त्यावरील जय संतोषी अपार्टमेंटमध्ये राहणारे फिर्यादी कपिल पाटील हा १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने बिल्डिंग सुपरवाझरचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्याने एका वृत्तपत्रात सार्वजनिक बांधकाम विभाग अंधेरी येथील कार्यालयात स्थापत्य अभियांत्रिकी सहायक गट (क) ची जागा भरण्यासंदर्भात जाहीरात प्रसिद्ध झाली होती. दरम्यान, फिर्यादीचा भाऊ हा आरोपी भरत शेलार याच्याशी ओळख होती. आपण अंधेरी सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी करीत असून कपिल यास नोकरीस लावण्यासाठी ७ लाख रुपये द्यावे लागतील असे त्यांनी सांगितले. आरोपीने हप्त्याहप्त्याने फिर्यादीकडून ७ लाख २ हजाराची रक्कम स्वीकारल्याचे पोलिसांनी सांगितले.मुंबई येथील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक गट या संदर्भातील लेखी परीक्षा पार पाडल्यानंतर आरोपी सर्व रक्कम स्विकारली असताना आपल्याला नोकरी संदर्भात आपल्याला कॉल येईल या आशेवर बरेच महिने निघून गेले. परंतु आपल्याला कॉल आला नसल्याने त्याने पालघर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. (प्रतिनिधी)उडवाउडवीची उत्तरेआपली पुरती फसगत झाल्याचे कपिलच्या लक्षात आले. दरम्यान, आरोपी भरत शेलार याची तुर्भे (नवी मुंबई) येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात बदली झाली होती. तेथे त्याची भेट घेतल्यानंतर तो उडवाडवीची उत्तरे देऊ लागला. आपली फसगत झाल्यानंतर फिर्यादीने सरळ पालघर पोलीस स्टेशन गाठून फिर्याद नोंद केली.तरी अटक नाहीपालघर पोलीस स्टेशनचे पो. नि. जय पाटील यांनी आरोपी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. परंतु आरोपी कामावर हजर होत नसल्याने अजूनही आरोपीला अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.