शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीव्हीचे घोंगडे दुकानदारांच्या गळ्यात?

By admin | Updated: March 3, 2016 02:09 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका शहरातील महत्वाच्या २१७ ठिकाणी ६८१ सीसीटिव्ही कॅमेरे बसवणार असली तरी पालिका हद्दीतील दुकानदारांनी त्यांच्या दुकानात व दुकानाच्या

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका शहरातील महत्वाच्या २१७ ठिकाणी ६८१ सीसीटिव्ही कॅमेरे बसवणार असली तरी पालिका हद्दीतील दुकानदारांनी त्यांच्या दुकानात व दुकानाच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, अशी सूचना पोलीस अधिकाऱ्यांनी केल्याने सुरक्षेच्या नावाखाली हा विषय दुकानदारांच्या गळ््यात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पालिकांकडून बसवल्या जाणाऱ्या सीटीटिव्हींची दुरूस्ती-देखभाल न झाल्यास काही काळातच ते बंद पडतात, त्यामुळे दुकानदारांनी कॅमेरे लावल्यास ते सुरूही राहतील व त्यातून गुन्हेगारीला आळा घालता येईल, असा पोलिसांचा प्रयत्न असल्याचे सांगितले जाते. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासंदर्भात पालिका आयुक्त रवींद्रन यांच्या दालनात बुधवारी झालेल्या बैठकीत याबाबतचा सर्व तपशील मांडण्यात आला. या बैठकीला वाहतूक विभागाच्या पोलिस उपायुक्त रश्मी करंदीकर, पोलीस उपायुक्त संजय जाधव, पालिकेचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे, कार्यकारी अभियंता यशवंत सोनवणे आदी उपस्थित होते. सीसीटीव्ही प्रकल्प अंमलबजावणी समिती आयुक्तांनी स्थापन केली आहे. असे कॅमेरे बसविण्यासाठी पीडब्लूसी या संस्थेला सविस्तर अहवाल द्यायला सांगितला होता. या ६८१ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कमांड रुम पोलिस उपायुक्तांच्या कार्यालयात असेल, तर सीसीटीव्ही रेकॉर्डिंंग पाहण्याची सुविधा व त्याचे डाटा सेंटर पालिका मुख्यालयात ठेवण्यात येणार आहे. या यंत्रणेत चित्रीकरणाचा साठा करून ठेवण्याचीही व्यवस्था आहे. पोलिस व इतर यंत्रणांना अलर्ट पाठविण्यासाठी व्हीडिओ अ‍ॅनालिटिक्स सॉफ्टवेअर आहे. इतर आवश्यक ठिकाणीही चित्रीकरण पाहता येईल. फुटेज पाहून तातडीने निर्णय घेण्यासाठी एसओपी, उपकरणाची देखभाल-दुरुस्तीचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात यईल.