शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

निधी चौधरी प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 01:55 IST

आयएएस अधिकारी निधी चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर अंबरनाथ पोलीस स्टेशनने या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. पालिकेतील कागदपत्रे आणि अहवाल मिळविण्याचे काम पोलीसांनी सुरु केले आहे.

अंबरनाथ : आयएएस अधिकारी निधी चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर अंबरनाथ पोलीस स्टेशनने या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. पालिकेतील कागदपत्रे आणि अहवाल मिळविण्याचे काम पोलीसांनी सुरु केले आहे. तर निधी चौधरी यांनी देखील आपली बाजू मांडण्यासाठी पालिकेतून कागदपत्रे मिळविण्याची धडपड सुरु केली आहे.आयएएस अधिकारी निधी चौधरी ह्या अंबरनाथ पालिकेत प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी असतांना त्यांनी पालिकेच्या मालकीच्या धोकादायक इमारती पाडल्या होत्या. त्या प्रकरणात अपहार झाल्याचा आरोप करून तक्रारदार गुलाब करंजुले यांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला जावा यासाठी न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाने तसा आदेश दिल्याने चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यात प्रमुख आरोप हा अपहार केल्याचा आणि खोटे दस्तावेज तयार केल्याचा गुन्हा आहे. सध्या चौधरी ह्या पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करित आहे. चौधरी यांनी न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी पालिकेतील कागदपत्रे गोळा केली आहेत. तसेच सर्व माहिती देखील त्यांनी मिळविली आहे. न्यायालयाने त्यांची बाजू जाणून न घेताच हा गुन्हा दाखल झाल्याने चौधरी यांनी न्यायालयात आपली बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी पुरावे मिळविण्याचे काम सुरु केले आहे. तर दुसरीकडे या प्रकरणाची चौकशी करुन त्याचा अहवाल न्यायालयात सादर करण्याची जबाबदारी ही पोलीसांवर असल्याने पोलीसांनी देखील या प्रकरणाची माहिती संकलीत करण्याचे काम सुरु केले आहे. ज्या इमारतींवर कारवाई करण्यात आली त्या इमारतींसंदर्भात पालिकेची भूमिका काय होती हे देखील जाणून घेण्याचे काम सुरु असल्याचे पोलीस अधिकाºयांनी स्पष्ट केले. तर या प्रकरणात चौधरी यांना जामिन मिळू नये यासाठी तक्रारदार करंजुले हे देखील आपल्या परिने प्रयत्न करित आहेत.