शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

वर्षअखेर ठरतेय उमेदवारांची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 23:24 IST

कार्यकर्त्यांकडून पार्ट्यांची अपेक्षा; गावांसाठी कामे करण्याचीही होतेय मागणी

पारोळ : पालघर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे ७ जानेवारीला मतदान होणार असल्याने व ३० डिसेंबर रोजी अगदी वर्षाअखेरीलाच अंतिम उमेदवार गटात व गणात जाहीर होणार असल्याने आपल्या पक्षातील कार्यकर्ते यांची मर्जी राखण्यासाठी व नवीन मतदारांना आकर्षित करण्यासाठी वर्षाअखेरीच्या पार्ट्या जोरात होण्याची शक्यता असून या पार्टीसाठी लागणारी रसद कार्यकर्ते उमेदवारांकडून घेण्याच्या चर्चा रंगत असल्याने हे नववर्षाचे स्वागत उमेदवारांना डोकेदुखी ठरणार आहे.वसई तालुक्यात ४ जिल्हा परिषद गट व ८ पंचायत समिती गण असून या वेळी कोणकोणत्या उमेदवारांमध्ये लढत होणार आहे हे सोमवारी कोण माघार घेतेय, यावर ठरणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या सर्व पक्षीय उमेदवारांनी आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी वरिष्ठ पातळीवर ताकद लावली आहे. उमेदवारी देताना त्या उमेदवाराची प्रतिष्ठा, पैसा व त्याच्या पाठीमागे उभे असलेले कार्यकर्ते या बाबींचा विचार झालेला आहे. जो उमेदवार उजवा त्यालाच उमेदवारी मिळालेली आहे. दरम्यान, निवडणूक प्रचारात कार्यकर्ते महत्त्वाचे ठरत असल्याने उमेदवारांना त्यांची वर्षाअखेर सुखद करावीच लागत आहे. प्रत्येक गावात तरुणांचे ग्रुप असल्याने त्यांच्याकडून काही मागणी होणार आहे. जर मागणी पूर्ण केली नाही तर निवडणुकीत मतदार दुरावल्याचा धोकाही उमेदवारांना आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये काही हजाराच्या घरात मतदार असल्याने व जर उमेदवारांची संख्या गणात किंवा गटात जास्त असेल तर शे-पाचशे वर विजयाचे गणित जुळत असल्याने उमेदवारांना मतदारांची मर्जी राखणे महत्त्वाचे ठरते. यंदा निवडणुकीची धामधूम वर्षाअखेरीला आल्याने उमेदवारांच्या खर्चात वाढ होणार आहे.निवडणुकीचा खर्च लाखांच्या घरातनिवडणूक आली की आपल्या हाती काही येईल ही अपेक्षा काही मतदारांना असते, तर आम्ही तुम्हाला मदत करू आमच्या गावाला याची व्यवस्था करा, अशी सार्वजनिक मागणीही काही वेळा करण्यात येते. तर निवडून येणारे कोणी काहीही करत नसल्याने आले संधी तर हात धुवून घ्या, अशी भावनाही काही मतदारांमध्ये असते. त्यामुळे आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा खर्चही लाखांच्या घरात गेला आहे.