शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

एडवणमध्ये शाळेचे तीन वर्ग भस्मसात

By admin | Updated: December 13, 2015 00:05 IST

एडवण येथील आदर्श शिक्षण संस्थेच्या विद्याभवन हायस्कूलला आज संध्याकाळी शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये तीन वर्ग भस्मसात झाले असून पसरणारी आग

पालघर : एडवण येथील आदर्श शिक्षण संस्थेच्या विद्याभवन हायस्कूलला आज संध्याकाळी शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये तीन वर्ग भस्मसात झाले असून पसरणारी आग स्थानिक तरूणांनी आटोक्यात आणल्याने वित्तहानी टळली. आज शनिवार असल्याने शाळा लवकर सुटल्याने विद्यार्थी या अपघातामधून बचावले असले तरी शाळेचे मोठे नुकसान झाले आहे.सफाळे जवळील एडवण येथे विद्याभवन हायस्कूल ही इंग्रजी माध्यमाची शाळा असून २२५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर त्या शाळेच्या इमारतीला लागूनच लीलाबाई धरमचंद खंडेलवाल वाणिज्य व कनिष्ठ महाविद्यालय आहे. आज संध्याकाळी ४.३० ते ५ वा. च्या सुमारास विद्याभवन शाळेच्या कॉन्फरन्स रूममधून धूर यायला सुरूवात झाल्याने उपस्थित माजी सभापती प्रभाकर ठाकूर, कोरेचे सरपंच आशिष पुरंदरे, तुषार ठाकूर, दिपेश ठाकूर, शैलेश पाटील, योगेश, प्रविण सोलंकी, निकेत ठाकूर, अरविंद पाटील इ. सह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शाळेकडे धाव घेतली. तरूणांनी कनिष्ठ महाविद्यालयातील वर्गखोल्यामधील बँचेस, कॉम्प्युटर इ. साहित्य बाहेर काढले. मात्र विद्याभवन शाळेत लाकडी साहित्य असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. पालघर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला मोठ्या अंतरामुळे उशीर झाला.