शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

बहाडोलीच्या जांभूळ उत्पादकांना फटका

By admin | Updated: May 9, 2017 00:19 IST

वसई पालघरच्याच नव्हे तर मुंबई गुजरातेपर्यंतच्या खवैय्यांना भुरळ पडणाऱ्या पालघर तालुक्यातील बहाडोलीच्या सुप्रसिद्ध जांभळांना

लोकमत न्यूज नेटवर्क पालघर/नंडोरे : वसई पालघरच्याच नव्हे तर मुंबई गुजरातेपर्यंतच्या खवैय्यांना भुरळ पडणाऱ्या पालघर तालुक्यातील बहाडोलीच्या सुप्रसिद्ध जांभळांना बहर आला असला तरी इतर ठिकाणच्या स्वस्त जांभळांमुळे त्यांचा दर यंदा दुपटीने घसरला असून त्यांचा मोठा फटका जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.येथील शेतकरी येथील जांभळे बाजारपेठांमध्ये नेत आहेत .मात्र इतर ठिकाणांहून येणारी जांभळे कमी भावात उपलब्ध असल्याने बहाडोलीच्या जांभळाचा भाव गडाडला आहे. ऐन बहरात उत्पन्नाचे साधन असलेल्या येथील शेतकऱ्यांना यामुळे मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागणार असल्याने येथील जांभूळ उत्पादक हवालदिल झाले आहेत. एकट्या बहाडोलीत जांभळाची सुमारे दोन हजार झाडे आहेत. त्यांना मे च्या दरम्यान बहर येतो . झाडावरील जांभळांची येथील शेतकरी विविध पद्धतीने तोडणी करतात व त्यानंतर करंडा पद्धतीने ती बाजारपेठेत किंवा व्यापारी वर्गाला विक्री करतात . यावेळच्या जांभळाच्या हंगामात बाजारपेठेत त्याला तेवढा रास्त मिळालेला दिसून येत नाही. गतवर्षी प्रति करंड्याला ५०० ते ६०० रु पये इतका भाव होता मात्र यावर्षी तो घसरून २५० ते ३०० करंडा एवढाच आहे यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत शेतकर्यांना करंड्यामागे तब्बल ३०० रु पये म्हणजे निम्मे नुकसान सोसावे लागत आहे असे या भागात सुमारे १०० उत्पादक शेतकरी असून त्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. यंदा उत्पादन चांगले पण भाव नाही, अशी अवस्था आहे.