शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

पूल खचून महिना उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 02:47 IST

तालुक्यातील वानगाव-वधना या रस्त्यावरील एैना येथील ब्रिटीशकालीन पूल महिनाभरापूर्वी खचला आहे. सध्या येथील पर्यायी वाहतूक एका कच्चा रस्त्याने होत असून पूल उभारणीची निविदा प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.

शौकत शेख  डहाणू : तालुक्यातील वानगाव-वधना या रस्त्यावरील एैना येथील ब्रिटीशकालीन पूल महिनाभरापूर्वी खचला आहे. सध्या येथील पर्यायी वाहतूक एका कच्चा रस्त्याने होत असून पूल उभारणीची निविदा प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यातच पालघर लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता सुरु असल्याने पुलाच्या कामाला अडथळा निर्माण झाला आहे.डहाणू सा.बां. विभाग अंतर्गत डहाणू-नाशिक राज्य मार्गाबरोबरच झाई-बोर्डी, वानगांव-वधना आशागड, आंबकेसरी, मोडगाव, उधवा, कासा, सायवन, वसा-करजगाव, घोलवड-कोसबाड, वानगांव, आगासन-चंडीपाडा, ऐना, दाभोण, सरावली-सावटा, असे एकूण २५२ किमीच्या रस्त्यावर एकूण ७० पूल आहेत. त्यापैकी बहुसंख्य पुलाची दयनीय अवस्था झाली आहे.पावसाळयाच्या दिवसांत येथील पूल पाण्याखाली जात असल्याने बारा, पंधरा तास असंख्य गावांचा संपर्क तुटत असतो. मात्र, वर्षानुवर्षे कोणतीच उपाय योजना केली जात नाही. गेल्या एक महिन्यापसून वानगांव-वधना या प्रमुख जिल्हा मार्गावरील एैना येथील जिर्ण व जुनाट कमकुवत होऊन त्यातील मोठ मोठे दगड निखळून गेल्याने त्याचा स्लॅब खचला आहे. हा पूल गेल्या ७० वषापुर्वीचा आहे. तो अरूंद असून दिवसेंदिवस या रस्त्यावरून मोठया प्रमाणात अवजड वाहने जात असल्याने पूल खचला आहे. सा.बां. विभागाने तात्पूरती वाहतूकीसाठी पर्यायी व्यवस्था केली असली तरी महिना उलटून ही नवीन पूलाचे बांधकाम सुरू होत नसल्याने टिका होत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पूल तयार होणे गरजेचे असतांना कोणतीच हालचाल होेत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.