शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

भाताणे गावातील पुलाची झाली दुरवस्था, पर्यायी मार्ग नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 00:40 IST

विरारमधील भाताणे गावात असलेल्या पुलाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.

विरार : विरारमधील भाताणे गावात असलेल्या पुलाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पुलाला भेगा पडल्या असून प्रवाशांसाठी हा पूल धोकादायक बनत चालला आहे. मात्र, गावकऱ्यांना प्रवास करण्यासाठी दुसरा मार्ग नसल्याने जीव मुठीत घेऊन या पुलावरून प्रवास करावा लागतो आहे.विरार महामार्गावरून काही अंतरावर असलेले भाताणे गाव हे अनेक वर्षांपासून धोक्याचा प्रवास करत आहेत. या गावात जाण्यासाठी मध्ये मोठी नदी पार करावी लागते. तर नदी पार करण्यासाठी बांधलेला पूल हा दिवसेंदिवस धोकादायक बनत असून पर्याय नसल्याने गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन येथूनच प्रवास करावा लागत आहे.दर वर्षी पावसाळ्यात नदीत पाण्याची पातळी वाढल्यावर पूल पाण्याखाली जातो आणि गावकºयांचा संपर्क तुटतो. अनेक वर्षांपासून हा पूल पाण्याखाली जात असल्याने पुलाचे बांधकाम कमकुवत होते आहे. पुलाला भेगा पडल्या असून पुलाच्या सळ्यादेखील बाहेर येत आहेत. तसेच पुलावर मोठ-मोठे खड्डे पडले असून अनेकदा दुचाकीस्वार यामुळे पडले आहेत. या गावात पर्यटन स्थळे तसेच अनेक आश्रम असल्याने पुलावरून नागरिकांची सतत ये-जा सुरू असते. तसेच या पुलावरून अवजड वाहने देखील जात असल्याने पुलाची अवस्था अधिकाधिक बिकट होत आहे.पावसाळ्यात पूल पाण्याखाली जात असल्याने नदीमधील कचरा पुलाच्या कडेला अडकलेला आहे. यामुळे दुर्गंधी पसरते आहे. गावकºयांनी अनेकदा प्रशासनाला तक्रार करूनही त्यांच्याकडून कोणतेही उत्तर येत नसल्याने गावकरी चिंतेत आहेत. पूल असलेल्या नदीत मगरी तसेच पूल कोसळण्याची भीती असल्याने सरस्वती नदी सारखी परिस्थिती उद्भवू नये अशी काळजी गावकºयांना वाटत आहे. पावसाळ्यात या पुलामुळे गावकºयांचे हाल होतात. यामुळे या पुलाची दुरु स्ती होणे गरजेचे आहे.येत्या आठवड्याभरात पुलाची दुरुस्ती करण्यात येईल. लवकरच काम पूर्ण करू. गावकºयांना प्रवासासाठी हा एकच पूल असल्याने योग्यवेळ पाहून याची दुरुस्ती करण्यात येईल. तर पावसाळ्यानंतर नवीन पूल बांधण्याचे काम सुरु होईल. - पी. आर. चव्हाण, कार्यकारी अभियंता, पी.डब्लू.डी.‘‘प्रशासनाला अनेकदा पुलाची दुरु स्ती करण्याबाबत सांगण्यात आलेले आहे. परंतु त्यांच्याकडून कोणतीच मदत झालेली नाही.’’- ज्योतोबा शेळके, सामान्य नागरिक‘प्रशासन मोठी दुर्घटना होण्याची वाट पाहत आहे. प्रशासन पाहणी देखील करून जात नाही. प्रवासासाठी दुसरा मार्ग नसल्याने या पुलाचा वापर करावा लागतो.’- विलास परु ळेकर, सामान्य नागरिक

टॅग्स :Vasai Virarवसई विरार