शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

खाडीचे पाणी शुद्ध करण्याला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 01:54 IST

ठाणे खाडीतील पाणी शुद्ध करून ते विकत घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सत्ताधाºयांच्या मदतीने महासभेत मंजूर करून घेतला असला, तरी आता हे खारे पाणी शुद्ध होण्याच्या प्रक्रियेत अडथळे आले आहेत.

ठाणे : ठाणे खाडीतील पाणी शुद्ध करून ते विकत घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सत्ताधा-यांच्या मदतीने महासभेत मंजूर करून घेतला असला, तरी आता हे खारे पाणी शुद्ध होण्याच्या प्रक्रियेत अडथळे आले आहेत. राष्ट्रवादीने त्यावरून विधिमंडळात आवाज उठवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची छाननी करण्याचे आदेश दिले आहेत.ठाणे शहराला २०२५ पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध असल्याची ग्वाही नुकतीच पालिकेने न्यायालयात दिली आहे. परंतु, असे असतानाही ठाणे खाडीतील खारे पाणी शुद्ध करण्यासाठी पीपीपी मॉडेलचा आधार घेऊन तब्बल २२ हेक्टर जागा ठेकेदाराला देण्याचा प्रस्ताव नुकत्याच झालेल्या महासभेत मंजूर करण्यात आला. जागा आपली, वीजही आपणच देणार, खाडीचे पाणीही फुकटात मिळणार, त्यानंतर शुद्ध केलेले पाणीसुद्धा पालिका विकत घेणार, हा सारा खर्च मोठा असून त्यामुळे पालिकेचेच नुकसान होणार आहे. यावरून महासभेतदेखील विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, भाजपाचे गटनेते मिलिंद पाटणकर आणि काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी आवाज उठवला होता. परंतु, त्यानंतरही सत्ताधाºयांनी हा प्रस्ताव बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतला. पालिकेच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागण्याची तयारी राष्टÑवादीने केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आ. आव्हाड यांनी या योजनेच्या व्यवहार्यतेबाबत शंका उपस्थित करणारे वक्तव्य अधिवेशनातील चर्चेत केले होते. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आश्वासन दिले. त्यामुळे प्रशासनासह सत्ताधारी शिवसेनेच्या मनसुब्यांवर पाणी फिरले आहे.