शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

बोईसर १०० टक्के बंद

By admin | Updated: August 21, 2015 02:16 IST

मैदान वाचविण्याकरिता सर्व पक्ष व संघटनांनी पुकारलेल्या बोईसर बंदला गुरुवारी १०० टक्के यश मिळाले. शहरातील संपूर्ण व्यवहार ठप्प झाले होते, तर सेनेने आयत्या वेळी बंदमधून माघार

पंकज राऊत, बोईसरमैदान वाचविण्याकरिता सर्व पक्ष व संघटनांनी पुकारलेल्या बोईसर बंदला गुरुवारी १०० टक्के यश मिळाले. शहरातील संपूर्ण व्यवहार ठप्प झाले होते, तर सेनेने आयत्या वेळी बंदमधून माघार घेऊनही नागरिकांनी कडकडीत बंद पाळला. शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले होते. त्यांनी प्रथम बोईसर रेल्वे स्थानकासमोर धरणे धरले. त्यानंतर, उड्डाणपुलावर रास्ता रोको करून आंदोलकांनी एमआयडीसी कार्यालयावर धडक मारली. त्याच वेळी चर्चेसाठी संध्याकाळी संघर्ष समिती व राजकीय पक्षांच्या नेत्यांना बोलविल्याचा मुख्यमंत्र्यांचा निरोप आला. त्यानुसार, संध्याकाळी संघर्ष समिती आणि मुख्यमंत्री यांची धावती भेटही झाली. या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.मैदान (प्लॉट) उद्योगाला विकण्याचा एमआयडीसीचा घाट १४ मे २०१० रोजी मोठे जनआंदोलन करून हाणून पाडला होता. त्यानंतर हा प्लॉट मैदानाकरिता राखीव ठेवण्यात येईल, असे आश्वासन एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देऊनही तो प्लॉट रामदेव सिंथेटिक्स या उद्योगाला विकण्याची प्रक्रिया सुरू केली. त्याचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर खैरापाडा, बोईसर व सरावली या तीन ग्रामपंचायती तसेच सर्व राजकीय पक्षांचे, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन मैदान बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून एमआयडीसी विरोधात लढा उभारून मैदान परत मिळविण्याचा निर्धार केला. आजचे आंदोलन हा त्याचाच एक भाग होता.पालघरचे तहसीलदार चंद्रसेन पवार व एमआयडीसीचे उपअभियंता पाटील मोर्चाला सामोरे गेले. तुमच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. आंदोलनामध्ये पालघरचे खा. चिंतामण वनगा, बोईसरचे आ. विलास तरे, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, माजी आ. मनीषा निमकर, भूमी सेनेचे अध्यक्ष काळुराम धोंदडे, मैदान बचाव समितीचे अध्यक्ष विवेक वडे, पालघर जि.प.चे कृषी सभापती अशोक वडे, मनसेचे माजी जिल्हाप्रमुख कुंदन संखे, बविआचे प्रशांत पाटील, प्रशांत संखे, अविनाश चुरी, झाकीर साठी, राष्ट्रवादीचे संजय पाटील, वैभव संखे, काँग्रेसचे राजेश अधिकारी व चंद्रकांत जाधव, आरपीआयचे सुरेश जाधव व सचिन लोखंडे, शिवसेनेचे नीलम संखे, आदी उपस्थित होते. बंद पाळूनही हाती फारसे काहीही न लागल्याने आंदोलन अधिक तीव्र करायला हवे अशी प्रतिक्रिया जनतेत उमटते आहे.गुरुवारी सकाळी आंदोलनस्थळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रभाकर राऊळ यांनी समर्थकांसह उद्योगमंत्र्यांबरोबर चर्चा केली असता त्यांनी सात दिवसांत संघर्ष समिती, सर्व राजकीय पक्ष व एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन योग्य तोडगा काढण्याचे मान्य केले आहे. तसेच त्यांनी हा बंद मागे घेण्याची केलेली विनंती मान्य करून सेनेने या बंदमधून माघार घेतल्याचे सांगितले. परंतु, मैदान वाचविण्याच्या मागणीस समर्थन असल्याचे सांगितले. मात्र, उद्योगमंत्र्यांनी बैठक अगोदरच घेऊन ठोस निर्णय न दिल्याने आता आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याची भूमिका उपस्थितांनी घेतल्यानंतर आजचे आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले असे समितीने स्पष्ट केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसोबत गुरुवारी संध्याकाळी संघर्ष समितीची मंत्रालयात धावती भेट झाली. या संदर्भातील विषय माझ्यापर्यंत आला असून त्या संदर्भातील फाईल मागवून अधिक माहिती घेऊन मी त्वरित निर्णय घेईन असे त्यांनी सांगितले. या वेळी माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, आ. विलास तरे, माजी आ. मनीषा निमकर, भाजपा महाराष्ट्र प्रदेशच्या सचिव अर्चना वाणी, बविआचे प्रशांत पाटील, प्रशांत संख्ये काँग्रेसचे राजेश अधिकारी उपस्थित होते.