वसई : वसईच्या रानगाव येथून पोशापीर खडक असलेल्या बेटावर समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या तरुणांची बोट धडक लागून उलटल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे. या घटनेत गिरीजच्या स्टिव्हन कुटिनो या ३७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून अन्य ५ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असल्याची माहिती वसईचे पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे यांनी ‘लोकमत’ला दिली आहे.वसई, रानगाव आणि गिरीज येथे राहणाऱ्या सहा मित्रांचा एक ग्रुप मासेमारीसाठी समुद्रात गेला होता. एक साधी बोट व एक मशीनची अशा दोन बोटी घेऊन ते भल्या पहाटे निघाले होते. मच्छीमारी करून झाल्यानंतर हे तरुण दुपारी ३ च्या सुमारास पोशापीर खडक बेटाच्या येथून परतत असताना अचानक आलेल्या लाटेच्या तडाख्यामुळे साध्या बोटीला खडकाची धडक लागून ती बोट समुद्रात पलटी झाली. तर दुसºया बोटीतील मित्रांनी तिघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यात दोघांना वाचवण्यात यश आले. मात्र स्टिव्हन कुटिनो या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
वसईच्या समुद्रात बोट उलटली; एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 01:39 IST