शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

वाडयात भाजपचा सेनेला धक्का

By admin | Updated: June 28, 2017 03:05 IST

कोका कोला कंपनीच्या सुरूवातीपासून असलेल्या शिवसेना प्रणीत कामगार युनियनला अखेरचा जयमहाराष्ट्र करून तिच्या कर्मचा-यांनी

लोकमत न्यूज नेटवर्क वाडा : कोका कोला कंपनीच्या सुरूवातीपासून असलेल्या शिवसेना प्रणीत कामगार युनियनला अखेरचा जयमहाराष्ट्र करून तिच्या कर्मचा-यांनी भाजप प्रणित युनियनचा झेंडा खांद्यावर घेतला. भाजपने या रुपाने सेनेला जोरदार धक्का दिला आहे. कोका कोला वाडा युनिटच्या कर्मचाऱ्यांनी भाजपा प्रणीत अखिल भारतीय कामगार संघ या युनियनची स्थापना केली आहे. कर्मचारी संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांच्याहस्ते गेट मिटिंगचा कार्यक्रम पार पडला. यावेळी भाजपचे वाडा तालुका अध्यक्ष संदीप पवार, भाजपचे भगवान चौधरी तसेच संघटनेचे सरचिटणीस सुहास माटे, चिटणीस विवेक घोलप, उपाध्यक्ष प्रशांत वर्तक आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षापासून कंपनी व्यवस्थापन करीत असलेला जुलूम, कामाची जबरदस्ती, विनामोबदला ड्युटी व्यतिरिक्त अतिरिक्त थांबवणे, प्रमोशन व पगारवाढीमध्ये चालढकळ तसेच बंद पडत चाललेल्या सोयी सुविधा यामुळे कंपनीमधील कर्मचारी खूप वैतागला होता. शिवसेनेच्या युनियनकडून कोणतेही सहकार्य मिळत नव्हते. त्यामुळे कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांनी भाजपाप्रणीत अखिल भारतीय कामगार संघटनेच्या युनियनचा झेंडा हाती घेण्याचा एकजुटीने निर्णय घेतला. गेट मिटिंगनंतर कर्मचारी संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील व पदाधिकाऱ्यांनी कोका कोला व्यवस्थापनाबरोबर मिटिंग घेवून त्यांना स्टाफवर होत असलेल्या अन्यायाची माहिती दिली. व्यवस्थापनाने त्यांना यापुढे पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. यावेळी वाडा तालुका अध्यक्ष संदीप पवार यांनी वाडा कोका कोला कंपनीच्या समस्या सोडविण्यासाठी पाठीशी राहील असे सांगितले. भारतीय जनता पार्टी प्रणीत संघटना अस्तित्वात येण्यासाठी शेखर वैद्य, अतुल वाडेकर, राजेंद्र चौधरी, शरद चासकर, अमोल सावंत, प्रशांत माळूंजकरस व दत्तात्रय गावकर यांनी खूप परिश्रम घेतले.