शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

भार्इंदर पालिकेला डॉक्टरची नोटीस

By admin | Updated: April 20, 2017 23:51 IST

मीरा-भार्इंदर पालिकेत कार्यरत असतानाही डॉ. मकरंद फुलझेले खाजगी प्रॅक्टिस करत असल्याने पालिकेकडून त्यांना दिला जाणारा

भार्इंदर : मीरा-भार्इंदर पालिकेत कार्यरत असतानाही डॉ. मकरंद फुलझेले खाजगी प्रॅक्टिस करत असल्याने पालिकेकडून त्यांना दिला जाणारा भत्ता वसूल करण्याची मागणी झाल्याने त्याबाबतची चौकशी सुरू झाल्याने ती थांबवावी, या मागणीसाठी त्या डॉक्टरांनी पालिकेला एक कोटीची अब्रूनुकसानीची नोटीस बजावली आहे. मी मागासवर्गीय असल्याने ही चौकशी सुरू असल्याचा, त्यामुळे मानसिक त्रास झाल्याचा आणि वैद्यक विश्वात बदनामी झाल्याचा मुद्दा त्यांनी या नोटिशीत मांडला आहे. पालिकेच्या इतिहासात डॉक्टरांकडून आलेली ही पहिलीच नोटीस आहे. पालिकेने मीरा रोड येथे २०१० मध्ये सुरु केलेल्या इंदिरा गांधी रुग्णालयात २४ मार्च २०११ ला डॉ. फुलझेले यांची रुग्णालय अधिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. या कार्यकाळात कामाबद्दल तक्रार नसल्याचा दावा त्यांनी केला. भाजपा नगरसेविका डॉ. वसाणी यांनी फुलझेले खाजगी दवाखाना चालवून रुग्णसेवा देत असल्याची बाब पुढे आणली. महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ नुसार हे कृत्य बेकायदा असल्याने खाजगी रुग्ण सेवा न देण्यापोटी फुलझेले यांना दिला जाणारा एनपीए (नॉ प्रॅक्टिस अलाऊंस) पालिकेने थांबवावा व आजवर दिलेला भत्ता वसूल करावा, अशी तक्रार त्यांनी गेल्यावर्षी १३ मार्चला वैद्यकीय विभागाकडे केली. फुलझेले चालवत असलेल्या खाजगी दवाखान्याची नोंद पालिकेच्या दफ्तरी नसल्याचा दावा वसाणी यांनी केला. नोंद नसलेल्या दवाखान्यामार्फत रुग्णांच्या आरोग्याशी खेळ चालविला असल्याची बाब त्यांनी वैद्यकीय विभागाच्या निदर्शनास आणली. या तक्रारींची दखल घेत प्रशासनाने वैद्यकीय विभागाचे प्रभारी मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश जाधव यांच्यामार्फत फुलझेले यांची विभागीय चौकशी सुरु केली आणि चौकशीबाबत सामान्य प्रशासन विभागाने गेल्यावर्षी १९ मे रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली. फुलझेले यांनी नोटिशीतील आरोपांचे खंडन केले व त्याचे उत्तर सामान्य प्रशासन विभागाला दिले. खाजगी रुग्णसेवेबाबत सविस्तर माहिती दिली नसल्याचा उल्लेख त्यात त्यांनी केला. सामान्य प्रशासनाने त्यांचे उत्तर अमान्य करीत शिस्तभंगाची नोटीस बजावली. पालिकेने आपल्यावर एकतर्फी कारवाई चालविल्याचा आरोप करीत फुलझेले यांनी वसाणी यांच्या तक्रारींना आधार नसल्याचा दावा केला. मी मागासवर्गीय असल्याच्या भावनेतून तक्रारी करण्याचा सपाटा नगरसेविकेने लावल्याचा दावाही त्यांनी केला. (प्रतिनिधी)