शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

भार्इंदरचा भुयारी मार्ग मे अखेर होणार खुला

By admin | Updated: May 9, 2017 00:15 IST

बहुप्रतीक्षित पूर्व-पश्चिम भुयारी मार्ग मे अखेर खुला होणार आहे. यामुळे पूर्व-पश्चिम वाहतुकीला तब्बल आठ वर्षांनंतर पर्याय उपलब्ध होणार

राजू काळे । लोकमत न्यूज नेटवर्कभार्इंदर : बहुप्रतीक्षित पूर्व-पश्चिम भुयारी मार्ग मे अखेर खुला होणार आहे. यामुळे पूर्व-पश्चिम वाहतुकीला तब्बल आठ वर्षांनंतर पर्याय उपलब्ध होणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी ‘लोकमत’ला दिली. २००५ पूर्वी पूर्व-पश्चिम येजा करण्याकरिता शहरात रेल्वे फाटकाचा एकमेव पर्याय होता. पालिकेने २००५ मध्ये दक्षिणेला इंदिरा गांधी उड्डाणपूल बांधल्याने रेल्वे फाटक बंद होऊन शहरातील वाहतुकीला उड्डाणपुलाचा पर्याय उपलब्ध झाला. सध्या या एकमेव उड्डाणपुलाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने तो महत्त्वाचा ठरत आहे. दोन्ही बाजूंना शहरीकरण होत असून त्याप्रमाणात वाहनांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे उड्डाणपुलावर वाहतूककोंडी नित्याची झाली असून त्याला पर्यायी मार्ग नसल्याने वाहनचालकांना कोंडीतूनच मार्ग काढावा लागतो. भार्इंदर रेल्वे स्थानकाच्या पूर्व-पश्चिमेहून वाहनचालकाला परस्पर विरुद्ध दिशेला जायचे झाल्यास त्याला उड्डाणपुलावरून जाण्यासाठी सुमारे पाच किलोमीटर अंतर कापावे लागते. त्यातच कोंडीत सापडल्यास अर्ध्या तासाचे अंतर सुमारे तास-दीड तासावर जाते. यामुळे पालिकेने उड्डाणपुलाला पर्याय म्हणून २००९ मध्ये खाडीजवळ भुयारी वाहतूक मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला हा मार्ग बॉक्स पुशिंग पद्धतीने बांधण्याचे ठरवण्यात आले. त्यासाठी सुमारे ९ कोटी ५० लाखांची तरतूद केली. या कामाच्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने पालिकेने सल्लागारांच्या सूचनेनुसार आयआयटीमार्फत प्रकल्पाच्या जागेची तपासणी केली. त्यात प्रकल्पाच्या जागेत दलदल असल्याने बॉक्स पुशिंगऐवजी मायक्रो टनेल ट्रेन्चलेस पद्धतीचा वापर करण्याची सूचना केली. पालिकेने त्यासाठी सुमारे ४३ कोटी ७६ लाखांच्या खर्चाची तरतूद अंदाजपत्रकात केली. सुमारे ७० मीटर लांबी व १० मीटर रुंदीचा भुयारी वाहतूक मार्ग बांधण्याचे कंत्राट २५ मे २०११ रोजी घई कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले. मार्ग पूर्ण करण्याची मुदत मे २०१४ पर्यंत होती. परंतु, रेल्वेने १५ डब्यांच्या लोकलसाठी फलाटांची लांबी वाढवून पश्चिम दिशेला नवीन यार्ड बांधल्याने परिणामी भुयारी मार्ग सुमारे ६ मीटर खाली नेण्याची सूचना पश्चिम रेल्वेकडून करण्यात आली. यामुळे प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाल्याने २०१४ मधील महासभेने १७ कोटींच्या खर्चाला मान्यता दिली.