शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बविआचे प्रशिक्षण शिबिर

By admin | Updated: October 8, 2015 23:12 IST

पालघर विधानसभा पोटनिवडणूक, ग्रामपंचायत निवडणुका व नव्याने निवडून आलेल्या नगरसेवक, नगरसेविकांना प्रशिक्षण याकरीता बहुजन विकास आघाडीने नानी दमण येथे प्रशिक्षण

- दीपक मोहिते,  वसईपालघर विधानसभा पोटनिवडणूक, ग्रामपंचायत निवडणुका व नव्याने निवडून आलेल्या नगरसेवक, नगरसेविकांना प्रशिक्षण याकरीता बहुजन विकास आघाडीने नानी दमण येथे प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले होते. गेले ३ दिवस सुरू असलेल्या या शिबीराचा काल सायंकाळी समारोप झाला.पालघर विधानसभा पोटनिवडणूक बहुजन विकास आघाडीने प्रतिष्ठेची केली असून ही निवडणुक जिंकायची अशा इर्षेने बहुजन विकास आघाडी कामाला लागली आहे. काँग्रेसच्या राजेंद्र गावित यांना रोखण्यासाठी बविआने रणनीती आखली आहे. येथे सेना, काँग्रेस, बहुजन विकास आघाडी अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. परंतु राष्ट्रवादी पक्षाचे वरिष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार यांनी पालघरची विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिल्यामुळे ही लढत चौरंगी होऊ शकते. गावित यांना रोखण्यासाठी अखेरच्या क्षणी बविआ व राष्ट्रवादी रिंगणातून बाहेर पडतील व सेना-काँग्रेस अशी सरळ लढत होईल असा अंदाज राजकीय वर्तुळामध्ये व्यक्त होत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे राजेंद्र गावित, सेनेच्या कृष्णा घोडांकडून कमी फरकाने पराभूत झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधून सेनेत आलेल्या कृष्णा घोडा यांनी विजयश्री अक्षरश: खेचून आणली होती. त्यांच्या निधनानंतर सेनेने त्यांचे चिरंजीव अमीत घोडा यांना रिंगणात उतरवण्याची तयारी चालवली आहे. तर दुसरीकडे बहुजन विकास आघाडीचे वरिष्ठ नेते आ. हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या तमाम कार्यकर्त्यांना नानीदमण येथे पाचारण केले. गेले ३ दिवस विधानसभा पोटनिवडणुक, ग्रामपंचायत निवडणुका व विरोधकांना सामोरे जाण्यासाठी रणनीती अशा ३ विषयांवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या शिबीरात सर्व नगरसेवक, जिल्हापरिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ज्येष्ठ नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते. काल सायंकाळी या शिबीराचा समारोप झाला.