शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

बँकांत झुंबड, एटीएम बंद, पहाटेपासूनच रांगा!

By admin | Updated: November 11, 2016 02:52 IST

नव्या नोटा घेण्यासाठी वसई विरार परिसरातील बँकांपुढे सकाळपासूनच लोक रांगा लागल्या होत्या. चार हजार रुपयांच्या नव्या नोटा हातात पडल्यानंतर नागरिक आनंदाने जाताना दिसत होेते

वसई : नव्या नोटा घेण्यासाठी वसई विरार परिसरातील बँकांपुढे सकाळपासूनच लोक रांगा लागल्या होत्या. चार हजार रुपयांच्या नव्या नोटा हातात पडल्यानंतर नागरिक आनंदाने जाताना दिसत होेते. मात्र, वसई विरार परिसरातील दुकाने आजही ओस पडली होती. बहुतेक सोनारांनी दुकाने बंद ठेवली होती. पेट्रोल पंप, मेडिकल स्टोअर्स, हॉस्पीटल्समध्ये जुन्या नोटा नाकारून लोकांची अडवणूक केली जात होती. तर हॉटेल व्यावसायिक जुन्या नोटा घेत नसल्याने खवय्यंनी पाठ फिरवली होती. नव्या नोटा घेण्यासाठी आणि पैसे भरण्यासाठी बँकांपुढे लोकांच्या मोठ्या रांगा लागलेल्या होत्या. अगदी सकाळपासूनच ते थेट बँका बंद होईपर्यंत लोकांच्या रांगा दिसत होत्या. नव्या नोटांसह सेल्फी आणि फोटो काढण्याचा मोह आवरता येत नव्हता. बँकांपुढे मोठ्या रांगा असल्या तरी सर्व व्यवहार अगदी शांततेत पार पडले होते. खबरदारी म्हणून पोलिसांनी गस्त घालीत बँकांच्या परिसरात नजर ठेवली होती. फक्त चार हजार रुपये हातात पडत असल्याने ते अत्यंत जपून खर्च करण्याची मानसिकता असल्याने बाजारात शुकशुकाट होता. व्यवहार ठप्प झाले होेते. बाजारपेठा आणि दुकाने ओस पडली होती. एखाद दुसरा अपवाद वगळता हॉटेल व्यावसायिक जुन्या नोटा घेत नसल्याने हॉटेलेही ओस पडली होती. बहुतेक सोनारांनी दुकाने बंद ठेवली होती. सरकारने पेट्रोल पंप, मेडिकल स्टोअर्स आणि हॉस्पीटल्सना जुन्या नोटा स्वीकारण्याचे आदेश दिले असले तरी वसई विरार परिसरात या आदेशाची सर्रासपणे पायमल्ली केली गेली. पेट्रोल पंपावर जुन्या नोटा घेतल्या जात नव्हत. डोकेदुखी नको म्हणून अनेक मेडिकल स्टोअर्स बंद ठेवण्यात आली होती. बहुतेक मेडिकल स्टोअर्स आणि हॉस्पीटल्समध्ये जुन्या नोटा घेतल जात नसल्याच्या असंख्य तक्रारी करण्यात येत होत्या. (प्रतिनिधी)