शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

बहुजन विकास आघाडीला करावे लागणार मंथन, कारणांचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 00:50 IST

वसई ग्रामीण भागात या लोकसभा निवडणुकीत अनेक गावात युतीच्या बाजूने मतदान झाल्याने या भागात युतीची ताकत वाढली

पारोळ : वसई ग्रामीण भागात या लोकसभा निवडणुकीत अनेक गावात युतीच्या बाजूने मतदान झाल्याने या भागात युतीची ताकत वाढली असून बहूजन विकास आघाडी चा हा मतदार युती च्या बाजूने उभा राहिल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत आघाडीला मोठी ताकद लावावी आहे.पूर्व भाग हा बोईसर विधानसभा मतदार संघात येतो या मतदार संघात बहुजन विकास आघाडी चा आमदार आहे. या त्यांच्या विजयात या भागातील मते निर्णायक ठरली आहेत. तर जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, ही आघाडीचे असताना या लोकसभा निवडणुकीत खानिवडे, शिरसाड, चांदीप, पारोळ, देपिवली, करजोण, मेढे, वडघर, मांडवी, टोकरे, तिल्हेर, नवसई इ. गावांमध्ये या लोकसभा निवडणुकीत युती ला जास्त मते मिळाली इतर गावात ही युतीची टक्केवारी वाढली या भागात शिवसेना, श्रमजीवी संघटना, भाजपा यांनी ताकत लावली असली तरी मोदी लाटेमुळे ही युती ला तरुण वर्गाने मतदान केल्याचे राजकीय जाणकाराचे मत आहे.बोईसर मतदार संघात येणारा वसई पूर्व भाग हा बहुजन विकास आघाडी चा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. खासदार, पंचायत समिती सभापती, उपसभापती, जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य याचा मान या भागातील नागरिकांना मिळाला आहे.>युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरणसहकार क्षेत्रातत ही याच भागातील नागरिक मोठ्या पदावर आहेत. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष यांनी मोठा विश्वास या भागातील कार्यकर्ते यांच्यावर टाकत या भागावर अनेक वर्ष निर्विवाद वर्चस्व निर्माण केली. कोणतीही ही निवडणूक असो विजय बहुजन विकास आघाडी चाच असायचा कोणी ही व्यक्ती उभी केली तर हितेंद्र यांच्या नावावर या भागात केलेल्या विकास कामांवर निवडून यायची पण या भागातील कार्यकत्यांची सामान्य माणसाची नाळ तुटल्याने व कार्यकर्ते मोठे झाल्याने जनमत दुरावले गेले याचा परिणाम या लोकसभा निवडणुकीत होत बहुजन विकास आघाडीची सत्ता असलेल्या गावात युतीने आघाडी घेतली यामुळे या भागात युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून बहुजन विकास आघाडीला ही आता मंथन करावे लागणार आहे.