शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ बाबूंनी ठेकेदारांना धरले वेठीला

By admin | Updated: October 22, 2016 03:28 IST

तालुक्यातील कुडूस मंडळ विभागाचे मंडळ अधिकारी हरिश्चंद्र भरसट यांनी आपल्या नवीन कार्यालयासाठी येथील ठेकेदारांना वेठीस धरले आहे. ते जबरदस्तीने ठेकेदारांकडून बांधकाम

- वसंत भोईर,  वाडातालुक्यातील कुडूस मंडळ विभागाचे मंडळ अधिकारी हरिश्चंद्र भरसट यांनी आपल्या नवीन कार्यालयासाठी येथील ठेकेदारांना वेठीस धरले आहे. ते जबरदस्तीने ठेकेदारांकडून बांधकाम साहित्य टाकून घेत असल्याने ठेकेदारांनी नाराजी व्यक्त होत आहे. मंडळ अधिकारी भरसट यांचे कुडूस येथे कार्यालय आहे. या कार्यालयात ते स्वत: कुडूस तलाठी व डोंगस्ते तलाठी अशी तिघांची कार्यालये आहेत. एकाच खोलीत तिनही कार्यालये असल्याने ही जागा अपूरी पडत असल्याने भरसट यांनी आणखी एक खोली वाढवली असून तिचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी ते येथील ठेकेदारांकडून जबरदस्तीने बांधकाम साहित्य टाकायला सांगत आहेत. कुणाला दगड तर कुणाला रेती, कुणाला वीट तर कुणाला सिमेंट, कुणाला मजूरीचे पैसे असे द्यायला सांगून ते आपल्या पदाचा दुरूपयोग करीत आहेत. शासकीय इमारती या सार्वजनिक बांधकाम विभाग अथवा जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडून बांधल्या जातात. त्यांची दुरूस्ती व देखभालीची कामे ही त्यांच्या कडूनच केली जातात असे असतांनाही शासकीय नियमांची पायमल्ली करीत आपल्या पदाचा दुरूपयोग करून भरसट यांनी कार्यालयाचे काम केलेले आहे. कुडूस परिसरात औद्योगिकीकरण वाढल्याने येथे जमिनीचे दर गगणाला भिडले आहेत. जमिनीचे व्यवहार झाल्यावर फेरफार टाकणे, ७/१२ बनविणे, जमिन बिनशेती (एन.ए) करणे तसेच या भागात मोठ्या प्रमाणात दगड खाणी असून त्यांना गौणखिनज (रायल्टी)ची परवानगी घेतली जाते ही कामे मंडळ अधिकाऱ्यामार्फत केली जातात. त्यामुळे मंडळ अधिकारी ही कामे मंडळ अधिकाऱ्यामार्फत केली जातात. त्यामुळे मंडळ अधिकारी कार्यालय म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी झाली आहे. येथे येण्यासाठी बोली लावली जाते. आर्थिक व्यवहार येथे मोठ्या प्रमाणात होत असल्याने मंडळ अधिकाऱ्यांना सुगीचे दिवस आले असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहेत. या कार्यालयात दलालांचा प्रचंड राबता दर दिवशी असतो. दरम्यान, नियमबाह्य काम करणाऱ्या मंडळ अधिकारी यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी मनसेचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष गोविंद पाटील यांनी तहसीलदारांकडे केली आहे. या संदर्भात मंडळ अधिकारी हरिश्चंद्र भरसट यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या बाबत बोलणे टाळले.