शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

वनरक्षकांवर हल्ला; तीन तस्कराना अटक

By admin | Updated: September 27, 2016 03:46 IST

विरार जवळील जंगलात जून महिन्यात वनरक्षकांवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करून फरार झालेल्या टोळीतील तीन तस्करांना पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्हीत

वसई : विरार जवळील जंगलात जून महिन्यात वनरक्षकांवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करून फरार झालेल्या टोळीतील तीन तस्करांना पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्हीत दिसलेल्या टेम्पोच्या वर्णनावरून पोलिसांनी ही कारवाई केली. याआधी पोलिसांनी दोघांना अटक केली होती. अद्याप ६ जण फरार आहेत.दहा जूनच्या पहाटे साडेचारच्या सुमारास हि घटना घडली होती. तस्करांची टोळी जंगलात वृक्षतोडीसाठी आणि शिकारीसाठी येणार असल्याची माहिती वसई वनविभागाला मिळाली होती. तीन वनवरक्षकांचे एक पथक त्यांना शोधण्यासाठी जंगलात निघाले होते. पहाटे साडेचारच्या सुमारास पाचरूखे जंगलात गस्त घालत असतांना टेम्पोतून आलेल्या दहाबारा तस्करांनी वनरक्षकांना कोंडीत पकडून दगडांनी हल्ला करून ते फरार झाले होते. या हल्ल्यात वनरक्षक एन.बी. दळवी गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला ३४ टाके पडून हात फ्रॅक्चर झाला होता. या हल्ल्यात इतर कर्मचाऱ्यांनी आपला जीव कसाबसा वाचविला होता.तस्कर टेम्पोतून पळून जात असतांना टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज विरार पोलिसांना सापडले होते. त्या आधारे त्यांचा शोध सुरू होता. याच तस्करांची टोळी महामार्गावर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा लावून हा टेम्पो ताब्यात घेऊन बाळकृष्ण भावर, आसिब मुल्ला व लक्ष्मण गुलुम या तिघांना अटक केली. या टोळीतील दोन तस्करांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.सीसीटीव्हीत टेम्पो दिसला असेल म्हणून या तस्करांनी टेम्पोची नंबर प्लेट बदलली होती तसेच टेम्पोचा रंग बदलला होता अशी माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक युनूस शेख यांनी दिली.